Sattari forest death Dainik Gomantak
गोवा

Hunting Accident Goa: अपघात की घातपात? सत्तरी शिकार प्रकरणातील मृत्यूमुळे खळबळ, संशयिताला 5 दिवसांची कोठडी

Sattari Forest Hunting Death: सत्तरी तालुक्यातील अडवई येथे जंगलात प्राण्यांची शिकार करताना बंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Sameer Panditrao

वाळपई: सत्तरी तालुक्यातील अडवई येथे जंगलात प्राण्यांची शिकार करताना बंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी अभिजीत नारायण देसाई (वय ३४ वर्षे, रा. दोडामार्ग) याला अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव हेमंत हिरबा देसाई (वय ३३, रा. देसाईवाडा, अडवई, सत्तरी) असे असून, मृत आणि संशयित दोघेही नात्यातील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवार, १० एप्रिल रोजी घडली. अभिजीत आणि हेमंत हे दोघे अडवई येथील जंगलात शिकारीसाठी गेले होते. रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास अभिजीतने बंदुकीत काडतूस भरले, तेव्हा अचानक गोळी सुटून ती थेट हेमंतच्या शरीरावर आदळली.

त्यात गंभीर जखमी झालेल्या हेमंतला प्रथम जंगलातून स्कूटरवरून मुख्य रस्त्यापर्यंत आणले आणि नंतर इतर वाहनाने वाळपई शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वाळपई पोलिसांना याची माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी तो गोमेकॉत पाठविला. तसेच अभिजीतला अटक केली. अभिजीत हा हेमंतच्या मामाचा मुलगा असून गेल्या दोन वर्षांपासून तो अडवईत राहतो.

घटनास्थळी गुरुवारी रात्रीपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. शुक्रवारी पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर, निरीक्षक प्रथमेश गावस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी जाऊन तपास केला. रक्ताचे नमुने, एक बंदूक, रिकामी काडतूस आणि एक स्कूटर जप्त केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला आहे.

संशयिताला कोठडी, शस्त्र जप्त

याप्रकरणी हेमंतच्या काकांनी वाळपई पोलिस ठाण्यात अभिजीतविरुद्ध तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता तसेच तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अभिजीतकडे असलेली बंदूक बेकायदेशीर होती. तिचा वैध परवाना नव्हता. अभिजीत याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे.

अपघात, की घातपात?

हा अपघात की घातपात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हेमंत देसाई याचा अचानकपणे मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री शोकाकुल वातावरणात हेमंतवर अडवई येथील स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षांची मुलगी, विवाहीत बहीण असा परिवार आहे. तो शेती आणि इतर व्यवसाय करायचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT