Thousands Of Candidates For 370 Posts Of GHRDC Dainik Gomantak
गोवा

GHRDC Recruitment: कंत्राटी 370 पदांसाठी हजारो युवकांची झुंबड; प्रशासन हतबल

मुलाखतींना पुन्हा बोलावणार

दैनिक गोमन्तक

GHRDC Recruitment: केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यात बेसुमार बेरोजगारी आहे. मात्र, याला राज्य सरकारने सातत्याने नकार दिलेला असतानाच बेरोजगारीचे खरे चित्र आता समोर येऊ लागले आहे.

मनुष्यबळ विकास महामंडळाच्यावतीने 370 कंत्राटी जागांच्या भरतीसाठी आज आयोजित केलेल्या थेट मुलाखतींसाठी हजारो युवकांनी उपस्थिती लावली.

त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अखेर प्रशासनाला हा मुलाखतीचा कार्यक्रमच रद्द करावा लागला आणि संबंधित उमेदवारांना नंतर बोलावण्यात येईल असे जाहीर करावे लागले.

मनुष्यबळ विकास महामंडळाकडून विविध 370 पदांसाठी सोमवारी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी हजारोंच्या संख्येने युवकांनी महामंडळाच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.

त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आणि या थेट मुलाखतींसाठी आलेल्या उमेदवारांकडून अर्ज ठेवून घेत मुलाखतीचा कार्यक्रमच रद्द केला. लवकरच या उमेदवारांना संपर्क करून मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष रुडॉल्फ फर्नांडिस यांनी दिली आहे.

मनुष्यबळ महामंडळाकडून दोन दिवसांपूर्वी 370 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत जाहिरात दिली होती.

महामंडळाचा अंदाज चुकला

कंत्राटी का असेना, पण सरकारी नोकरी मिळते म्हणून अनेक उमेदवारांनी थेट महामंडळाचे कार्यालय गाठले.

मात्र, प्रशासनाला एवढ्या गर्दीचा अंदाज नव्हता. त्यामुळे मुलाखतीवेळी गोंधळ उडाल्याने मधला मार्ग काढत उमेदवारांचे अर्ज ठेवून घेत नंतर मुलाखतीसाठी फोन करून बोलावण्याचे महामंडळाने जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT