Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: वास्कोतील मानवी तस्करीप्रकरणी तिसऱ्या संशयिताला अटक; नोकरीचे आमिष देऊन महिलेची केली होती फसवणूक

Vasco Crime News: वास्कोतील मानवी तस्करीप्रकरणी अक्रम अली शेख या तिसऱ्या संशयिताला चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

Vasco Human Trafficking Case

पणजी : वास्कोतील मानवी तस्करीप्रकरणी अक्रम अली शेख या तिसऱ्या संशयिताला चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या वतीने अरुणेंद्र पांडे (संस्थापक आणि संचालक, अर्ज) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तस्करीची घटना १९ ते २८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडली होती. या काळात सय्यद अब्दुल्ला शेख आणि मस्तान खान ऊर्फ पठाण यांनी पीडितेला मस्कत येथे घरकामाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि तेथे पोहोचल्यावर वेतन दिले जाईल, असे सांगितले.

परंतु, या दोघांनी फसवणूक करून पीडितेला मस्कत येथे पाठविले व एका फ्लॅटमध्ये अन्य ११ भारतीय महिलांसोबत ठेवले, जिथे योग्य अन्न व निवासाची सुविधा नव्हती.

त्यानंतर इतर आरोपींच्या मदतीने पीडितेला एका शेखच्या घरी कामासाठी पाठविण्यात आले. तिथे तिच्यावर लैंगिक शोषणासाठी दबाव टाकण्यात आला. सध्या दोघे संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT