Goa Market Federation Fraud: ज्यादा दरानं कांदा विक्री करणं पडलं महागात; गोवा मार्केटिंग फेडरेशनवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल

Goa Market Federation: गोवा मार्केटिंग फेडरेशनने तब्बल ५ कोटी ५६ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आलीय.
Goa Market Federation Fraud
Goa Market Federation FraudDainik Gomantak
Published on
Updated on

नाशिक : गेल्या वर्षी नाशिक नाफेड कार्यालयाकडून अत्यंत कमी दरात कांद्याची खरेदी करून तोच कांदा जादा दराने बाजारात विक्री करीत गोवा मार्केटिंग फेडरेशनने तब्बल ५ कोटी ५६ लाखांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गोवा मार्केटिंग फेडरेशनविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिनाथ नाईक असे गुन्हा दाखल केलेल्या गोवा फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

१ ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या दरम्यान नाईक यांनी गोवा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नाशिक नाफेड कार्यालयाकडून जिल्ह्यातील फेडरेशन व वेगवेगळ्या एफपीसीकडून पुरवठा केलेला १,५८३.१७८ टन कांदा अवघ्या ३५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केला.

Goa Market Federation Fraud
38th National Games 2025: अभिमानास्पद... गोव्याच्या बाबूची रौप्याला गवसणी, 'लेझर रन'मध्ये एकूण चार पदके

गोवा मार्केटिंग फेडरेशनने हा अल्प दरात खरेदी केलेला कांदा स्वत:च्या फायद्यासाठी चढ्या दराने बाजारात विक्री करीत ५ कोटी ५६ लाख २१ हजार १६० रुपयांचा स्वत:चा फायदा केला.

प्रत्यक्षात हा कांदा गोवा मार्केटिंग फेडरेशनचे नाफेडच्या योजनेनुसार सामान्य जनतेला उपलब्ध करून देणे गरजेचे होते; परंतु तसे न करता गोवा फेडरेशनने नाफेड आणि सामान्य जनतेचीही फसवणूक करीत साडेपाच कोटींचा अपहार केला आहे.

Goa Market Federation Fraud
Konkan Or Goa: कोकण की गोवा? निसर्ग पर्यटनासाठी कुठं पसंती द्याल?

ही बाब उघडकीस आल्याने यासंदर्भात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गोवा फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक यांच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com