Crime 

 

Dainik Gomantak 

गोवा

नुवे येथील माडांच्‍या बागेत सापडली मानवी हाडे

मडगावचे पोलिस उपअधीक्षक हरीश मडकईकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: नुवे (Nuvem) येथे एका माडांच्‍या बागेत काल मानवी हाडे सापडल्‍याने खळबळ उडाली. हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता गृहीत धरून मायणा-कुडतरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा (Crime) नोंद केला आहे.

काल शुक्रवारी ही हाडे (Bones) सापडली होती. ती पुरुषाची की महिलेची हेही कळत नव्हते. मात्र घटनास्थळी आढळून आलेले लांब केस आणि बांगड्या यामुळे ती महिलेच्या मृतदेहाची हाडे असावीत असा अंदाज पोलिसांनी (Police) बांधला आहे. हा मृत्यू बऱ्याच दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मडगावचे (Margao) पोलिस उपअधीक्षक हरीश मडकईकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तर, हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी गृहीत धरून खुनाचा गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला होता. पोलिस निरीक्षक सागर एकोस्‍कर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT