Zuari Bridge Traffic Dainik Gomantak
गोवा

Zuari Bridge Traffic : उद्घाटनाआधीच झुआरीवर पुन्हा वाहतूक कोंडी

पणजी-मडगाव मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

आदित्य जोशी

New Zuari Bridge : उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या नव्या झुआरी पुलाचं आज लोकार्पण होणार आहे. मात्र त्याआधीच पणजी-मडगाव मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नव्या झुआरी पुलाच्या एका टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांमुळे पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी गोवा वेल्हापासून ते झुआरी पुलापर्यंत झाली आहे.

बहुचर्चित झुआरी नदीवरील नवा केबल स्टेट पूल उद्‍घाटनानंतर आज गुरुवारी मध्यरात्रीपासून खुला केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. झुआरी पूल सुरु झाल्यामुळे पणजी-मडगाव मार्गावरील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल बुधवारी मंत्री, आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते यांची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. मुख्यमंत्री म्हणाले, झुआरी पुलाचे उद्‍घाटन सायंकाळी 7 वाजता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. मात्र, लोकांसाठी हा पूल सायंकाळी 4 वाजल्यापासून खुला असेल. नागरिकांना प्रत्यक्ष पुलावर चालण्याची ही शेवटची संधी असेल. उद्‍घाटन झाल्यानंतर पुलावरचे सर्व साहित्य हटवण्यात येईल आणि रात्री बारानंतर हा पुल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

90-10 टक्क्यांची मागणी

मुख्यमंत्री सावंत दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. या संदर्भात ते म्हणाले, की राज्यातील केंद्रीय प्रकल्पांसाठी 60-40 टक्के अशी तरतूद आहे. 60 टक्के खर्च हा केंद्र सरकार करते. तर 40 टक्के खर्च राज्य सरकारला भरावा लागतो. मात्र, गोवा उशिरा मुक्त झाल्याने पहिल्या दोन वित्त आयोगाचा लाभ राज्याला मिळाला नाही. त्यामुळेच राज्यात राबवल्या जाणाऱ्या केंद्रीय योजनांसाठी 90 टक्के खर्च केंद्राने करावा आणि 10 टक्के खर्च राज्य सरकार करेल, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

ॲपसाठी 650 पेक्षा अधिक नोंदणी

दुसरीकडे राज्यातील खासगी बसेससाठी 26 जानेवारीला विशेष योजना जाहीर होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तर टॅक्सी ॲप 5 जानेवारीपासून सुरू होईल. आतापर्यंत 650 पेक्षा अधिक व्यावसायिकांनी ॲपसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती मंत्री खंवटे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाकिस्तानात प्रेम, लग्न अन् भारतात राहून हेरगिरी, एनआयएने जफर रियाजला ठोकल्या बेड्या; आयएसआयचा निघाला हस्तक

Goa Luthra Case: लुथरांच्या जामिनाला सरकारकडून आव्हान; बर्चप्रकरणी खंडपीठात धाव: अजय गुप्तालाही नोटीस, 15 रोजी सुनावणी

Hamza Burhan killed: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड 'हमजा बुरहान' ठार; मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरानं गोळ्या झाडून संपवलं

Pharmacy Strike: इस्‍पितळे वगळता इतर फार्मसी दिवसभर होत्या बंद; 'AIOCD'च्‍या देशव्‍यापी आंदोलनाला गोव्‍यातूनही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

Margao: रुग्णवाहिकेला विलंब झाल्याने रुग्णाचा मृत्यू; सामाजिक कार्यकर्ते भगत यांचा दावा, 'ईएसआय'चे मात्र कानावर हात

SCROLL FOR NEXT