Margao Cancona  Dainik Gomantak
गोवा

Margao Traffic Jam: एकीकडे रस्त्याचे काम दुसरीकडे कंटेनरवर कोसळले झाड, काणकोण-मडगाव मार्गावर वाहतूक कोंडी

घटनास्थळी वाहतूक पोलिस दाखल झाले असून, ते वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Pramod Yadav

Traffic Jam On Margao Cancona Highway: मडगाव - काणकोण महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वेळ्ळी येथे कंटेनरवर मोठे झाड कोसळले असून, दुसरीकडे मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

घटनास्थळी वाहतूक पोलिस दाखल झाले असून, ते वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील बऱ्याचवेळापासून मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव - काणकोण महामार्गावर वेळ्ळी येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मार्गावर एकीकडे मोठे झाड कंटेनरवर पडले असून, दुसरीकडे मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने त्या मशीन रस्त्यावर कार्यरत आहेत. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दोन्ही दिशेने येणारी वाहने एकाच ठिकाणी अडकून पडल्याने मागील अनेक तासांपासून वाहतूक खोळंबली आहे.

कंटेनरवर पडलेले झाड हटविण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. तर, लहान वाहनचालक मिळेल त्या जागेतून वाट काढत वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या कोंडीमुळे महामार्गावर दोन्ही दिशेला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या कोंडीत सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बस आणि खासगी वाहने अडकून पडली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT