Amboli Ghat Dainik Gomantak
गोवा

Amboli Ghat: आंबोली घाटात दरड कोसळली, मोठी दुर्घटना टळली

Landslide at Amboli Ghat: आंबोली गुरुवारी सकाळी दरड कोसळून रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, यावेळी मार्गावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Pramod Yadav

सावंतवाडी: मान्सून सुरु होण्यापूर्वी आंबोली घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. आंबोली - गोवा मार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. आंबोली धबधब्यापासून जवळच ही दुर्घटना घडली आहे. यात कोणालाही इजा झाली नाही पण, मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गुरुवारी (२२ मे) सकाळी ही घटना घडली.

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणासह गोव्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे विविध ठिकाणी झाडे कोसळण्यासह रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या. आंबोली गुरुवारी सकाळी दरड कोसळून रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, यावेळी मार्गावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

पण, याचवेळी मार्गावरून जात असलेली रुग्णवाहिका याठिकाणी अडकून पडली. सजग नारिकांनी मार्गातील दगड गोटे बाजुला करत रुग्णवाहिकेला मार्ग करुन दिला. सध्या दरड हटविण्याचे काम सुरु असून, लवकरच मार्ग पूर्ववत केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दिली जात आहे.

आंबोली घाट अपघात प्रवण क्षेत्र आहे. मान्सून सुरु झाल्यानंतर घाटातील सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालत असते. येथील आंबोली धबधब्यावर लाखो पर्यटक भेट देत असतात. पण, पावसाळ्यात हा घाट प्रवासासाठी धोकादायक बनतो.

दरड कोसळण्याची भीती, धुक्याची दाट चादर यामुळे अपघाताची शक्यता वाढते. पण, मान्सूनपूर्वच दरड कोसळल्याची घटना घडल्याने मान्सून सुरु होण्यापूर्वी आवश्यक उपाययोजन करण्याची मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Independence Day 2025: आपल्या हाती जे ‘स्व-निर्णयाचं बळ’ आहे, त्याची ताकद स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरतरी प्रत्येकाच्या लक्षात येऊ दे

PM Modi Speech: टॅक्सचं ओझं कमी होणार, तरुणांसाठी रोजगार योजना; PM मोदींच्या लाल किल्ल्यावरुन दोन मोठ्या घोषणा

Chorao Ferryboat: महिनाभरापूर्वी बुडालेली फेरीबोट झाली दुरुस्त, ‘बेती’ पुन्हा सेवेत दाखल

Goa Today Live News: गोव्याला १४ वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाले पण...

Cutbona Jetty: 1655 खलाशांची तपासणी, कॉलराची 13 प्रकरणे; कुटबण जेटीवर उपजिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

SCROLL FOR NEXT