Goa Driving License Dainik Gomantak
गोवा

Goa Driving License: गोव्यात नवीन लायसन्स काढायचंय? जाणून घ्या ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

New Driving License: आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट व्यतिरिक्त, भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स.

Manish Jadhav

Goa Driving License Process

आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट व्यतिरिक्त, भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स.

तरुण, प्रौढ व्यक्तींसाठी वाहन चालवण्याचा कायदेशीर पुरावा म्हणून याकडे पाहिले जाते. मग ते दोन, तीन किंवा चारचाकी वाहने असो. दुसरीकडे, जर तुम्हाला गोव्यात ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल प्रोसेस अगदी सोपी आहे.

यापूर्वी, ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) मिळणे म्हणजे आरटीओमध्ये जाणे, फॉर्म भरणे, गहाळ किंवा अतिरिक्त कागदपत्रांसाठी मागे-मागे धावणे आणि काहीवेळा, अधिकार्‍यांना मस्का लावणे किंवा काम करण्यासाठी मध्यस्थ मिळवावे लागणे आणि शेवटी परवाना मिळण्यापूर्वी भरमसाठ फी भरुन भरणे, यासरख्या अडचणींचा सामना करावा लागायचा.

पण आज काळ बदलला आहे. आजकाल इंटरनेट आणि अद्ययावत प्रणालीमुळे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणे सोपे झाले आहे. फॉर्म आणि पेमेंटसाठी ही पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया आहे, तर कागदपत्र पडताळणी आणि इतर प्रक्रियांसाठी तुमची उपस्थिती आवश्यक आहे. तथापि, जर तुम्ही गोव्यात (Goa) नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करत असाल तर, काही स्टेप्स खालीलप्रमाणे...

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज कसा करायचा...

सर्वप्रथम, गोवा परिवहन विभागाच्या वेबसाइटवर जा. ज्यावर तुम्हाला अनेक पर्याय समोर दिसतील. या पर्यायामध्ये 'ऑनलाईन सर्व्हिस' या पर्यायामधील 'ड्रायव्हिंग लायसन्स' या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. (गोव परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.) https://goatransport.gov.in/

पुढे, राज्य हा पर्याय निवडा, आणि Learner's License अंतर्गत, 'Application for New Learner's License' वर क्लिक करा.

पुढे, फॉर्म भरा. कोणत्याही प्रकारची चुका होणार नाही याची खात्री करा, सबमिट करण्यापूर्वी फॉर्मचे व्यवस्थित पुनरावलोकन करा.

पुढे, तुम्हाला लायसन्स काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे सबमिट करावी लागतील. नंतर दस्तऐवजावर ई-स्वाक्षरी करावी लागेल. यानंतर फी भरणे, स्लॉट बुकिंग आणि शिकाऊ परवाना चाचणी.

हे लक्षात घ्यावे की, आधार कार्ड अर्जदारासाठी ऑनलाइन परिक्षा घेतली जाऊ शकते आणि त्यानंतर ई-लर्नर परवाना त्वरित जारी केला जाईल.

तथापि, आधार कार्ड (Aadhar Card) नसलेल्या अर्जदारांसाठी, संबंधित केंद्रांवर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT