Goa Congress Candidate Asset Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Candidate Asset: खलपांकडे 6.22 तर विरियातो यांच्याकडे 1.96 कोटींची मालमत्ता; अर्ज दाखल

Goa Congress Candidate Asset: खलप आणि विरियातो यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, दोघांनी अनुक्रमे 6.22 आणि 1.96 कोटींची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे.

Pramod Yadav

Goa Congress Candidate Asset

गोव्यात इंडिया आघाडीचे रमाकांत खलप आणि विरियातो फर्नांडिस यांनी आज रामनवमीच्या मुहूर्तावर अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी भाजपच्या पल्लवी धेंपे आणि श्रीपाद नाईक यांनी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

खलप आणि विरियातो यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, दोघांनी अनुक्रमे 6.22 आणि 1.96 कोटींची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे.

अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी 20.48 लाख रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे. खलप यांनी मुंबई विद्यापीठातून बीएस्सीची पदवी घेतली असून, कर्नाटक विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण घेतले आहे.

तर, कॅप्टन विरियातो यांनी 1.95 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली. आर्थिक वर्ष 2022-23 साठी त्यांनी 8.37 लाख रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे.

दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर गोव्याचा आवाज आणि लढाई दिल्लीत नेणार, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. पणजी व मडगावमध्ये अर्ज सादर करण्यापूर्वी फेरी काढून कॉंग्रेसने घटक पक्षांच्या नेत्या कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन केले.

भाजप उमेदवारांची संपत्ती

भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांची तब्‍बल 255.44 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर, त्‍यांचे पती उद्योजक श्रीनिवास धेंपे यांची एकूण मालमत्ता 994.83 कोटी एवढी आहे. या दोन्‍ही मालमत्तांची एकूण बेरीज केल्‍यास तो आकडा 1,250 कोटींवर पोहोचतो.

तर, श्रीपाद नाईक यांची मालमत्ता केवळ 13 कोटी 93 लाख रुपयांची आहे. तसे त्‍यांनी आज भरलेल्‍या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धारदार शस्त्राने वडिलांचा जीव घेणारा प्रमोद 'मानसिक रुग्ण'; बहिणीचा पोलिसांसमोर खुलासा

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Electricity: फाईव्ह स्टार एसी, Led दिवे; वीज बचतीबाबत सरकारी कार्यालयांसाठी नवी नियमावली

Cash For Job Scam: मंत्र्यांच्‍या कार्यालयांशी जवळीक, म्हणून अनेकजण भुलले 'श्रुतीला'; कष्टाची कमाई गमावली !

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

SCROLL FOR NEXT