How CM Pramod Sawant is out of state when there is strong political movement in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू असतांना मुख्यमंत्री राज्‍याबाहेर

भाजपने कितीही मुख्यमंत्री बदलले तरी लोकांचा मूड बदलणार नाही, गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री सावंत यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांच्या विरोधातील जनभावना वाढत चालली आहे,

दैनिक गोमन्तक

पणजी: निवडणुकीपूर्वी (Goa Elections) दोन महिने आधीच मुख्यमंत्री बदलण्याच्या प्रक्रियेत असलेल्या भाजपवर आपने पुन्हा हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांचे सरकार गोव्यात अपयशी ठरले, हे त्यांच्या पक्षाने अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. तसेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप अद्याप स्पष्टीकरण देवू शकले नाही, सध्या राज्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू आसतांना मुख्यमंत्री वैयक्तीक कारणासाठी राज्‍याबाहेर कसे काय जातात? असे आम आदमी पक्षाचे (AAP) उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक (Valmiki Naik) म्हणाले.

कालच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले होते की, भाजपने कितीही मुख्यमंत्री बदलले तरी लोकांचा मूड बदलणार नाही, गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री सावंत यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांच्या विरोधातील जनभावना वाढत चालली आहे,त्यामुळे येत्या निवडणुकीत गोव्यातील जनता भाजपाला उखडून टाकतील.

आज पत्रकारांशी बोलताना उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी अनेक मुद्यांवर भाजप कसा अपयशी ठरला यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, डॉ. सावंत सरकारने दुसऱ्या लाटेच्या वेळी गोवेकरांना त्यांच्या गरजेच्या वेळी दुर्लक्ष केले. गोव्यात जेव्हा कोविडची प्रकरणे झपाट्याने वाढत होती, तेव्हा सरकार निष्क्रिय ठरले, परिणामी गोव्यातील संसर्गाचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले होते. नुकताच गोव्यात लेबर गेट घोटाळा समोर आला असून त्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बांधकाम मंडळाकडून कामगारांना दिले जाणारे पैसे त्यांच्याच कार्यकर्त्यांना वाटले आहेत. कोविड योद्ध्यांना पगारात 20 टक्के वाढ देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ते रोजगार उपलब्ध करण्यात अपयशी ठरले.तसेच न्यायालयाच्या आदेशानंतरही खाणकाम सुरू होत नाही.

अमित पालेकर म्हणाले, भाजपचे अपयश सर्व गोवेकरांना स्पष्ट दिसत आहे.भाजपने उत्तराखंड आणि गुजरातमध्येही असेच केले आहे भाजपने आपला आव्हान म्हणून पाहिले आहे. गोव्यात विकास आणण्यासाठी गेली 5 वर्षे काय केले गेले याचे उत्तर आज सरकारने देण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

SCROLL FOR NEXT