Arvind Kejriwal Arrested  Dainik Gomantak
गोवा

Delhi Liquor Scam: 45 कोटी गोव्यात कसे पोहोचले? चनप्रीत केजरीवालांचे कनेक्शन काय? ED च्या आरोपपत्रात अनेक खुलासे

Delhi Liquor Policy Scam: न्यायालयाने ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत केजरीवाल यांना समन्स बजावले आहे.

Pramod Yadav

दिल्लीच्या मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. चार्जशीटमध्ये ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीलाही आरोपी केले आहे.

आरोपपत्रात ईडीने अरविंद केजरीवाल यांचा घोटाळ्यातील किंगपिन आणि सूत्रधार म्हणून वर्णन केले आहे. याशिवाय गोव्याच्या निवडणुकीत हवालाद्वारे आलेल्या पैशाचा वापर झाल्याचा दावा ईडीने केला आहे.

दक्षिण ब्लॉकचे काही नेते आणि मद्य व्यावसायिकांनी दिल्ली मद्य धोरण 2021-22 त्यांच्या सोईप्रमाणे तयार करण्यासाठी 100 कोटी रुपयांची लाच दिली होती. या निधीमध्ये 45 कोटी रुपये आम आदमी पक्षाला पाठवण्यात आले होते, जे 2022 मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खर्च करण्यात आले होते. आम आदमी पक्षाने हे पैसे त्यांच्या हिशोबातही दाखवले नाहीत. एवढेच नाही तर निवडणूक आयोगालाही कळवले नाही, असे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.

आरोपपत्रात अरविंद केजरीवाल आणि आरोपी विनोद चौहान यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटचा तपशील देण्यात आला आहे. के कविता यांच्या पीएने विनोदच्या माध्यमातून आम आदमी पक्षाला गोवा निवडणुकीसाठी 25.5 कोटी रुपये पाठवल्याचा आरोप आहे.

ईडीचे म्हणणे आहे की, विनोद चौहान यांचे अरविंद केजरीवाल यांच्याशी चांगले संबंध असल्याचे या गप्पांमधून स्पष्ट झाले आहे. मंगळवारी न्यायालयाने ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत केजरीवाल यांना समन्स बजावले आहे.

मद्य धोरण प्रकरणात मनी लाँड्रिंगचा तपास करत असलेल्या ईडीने अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती. ते सध्या तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल यांना 12 जुलै रोजी हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

45 कोटी मिळवण्यात चरणप्रीतची महत्त्वाची भूमिका

चनप्रीत सिंगने गोवा निवडणुकीत हवालाद्वारे 45 कोटी रुपये मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे ईडीने म्हटलंय. चरणप्रीतच्या बँक खात्याच्या तपशीलांची छाननी करण्यात आली.

'आप'कडून त्यांना थेट एक लाखाहून अधिक रक्कम मिळाली होती. चरणप्रीत सिंग हे रथ प्रॉडक्शन मीडियाचे कर्मचारी होते आणि 2020 पासून फ्रीलान्स म्हणून AAP च्या गोवा निवडणूक प्रचाराचा भाग होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

SCROLL FOR NEXT