Goa Crime News: मंत्र्यासोबत हुज्जत भोवली, गोव्यात अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Goa News: दोघांनीही एकमेकांविरोधात कोलवाळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केलीय.
Minister Nilkanth Halarnkar And Actor Gaurav Bakshi
Minister Nilkanth Halarnkar And Actor Gaurav BakshiDainik Gomantak
Published on
Updated on

कार बाजुला घेण्यावरुन झालेल्या वादात गोव्यातील अभिनेत्या विरोधात कोलवाळ पोलिसांनी अखेर गुन्हा नोंद केला आहे.

अभिनेत्याला 48 तासांत अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा मंत्री हळर्णकरांच्या समर्थकांनी दिला आहे. रेवोडा येथे अभिनेता गौरव बक्षी आणि हळर्णकरांचे पीएसओ व कारचालक यांच्यात वाद झाला.

रेवोडा पंचायतीजवळ बुधवारी (१० जुलै) सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. मंत्री नीळकंठ हळर्णकर रेवोडा येथे वृक्षारोपण करण्यासाठी गेले होते. दरम्यान यावेळी कार बाजुला घेण्यावरून मंत्री हळर्णकरांचे PSO (वैयक्तिक सुरक्षा अधिकारी) कारचालक आणि अभिनेता गौरव बक्षी यांच्यात वाद सुरु झाला.

दोघांनीही एकमेकांविरोधात कोलवाळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. मंत्र्यांची गाडी अडवून अडथळा निर्माण केल्याचे PSO ने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी आता गुन्हा नोंद करण्यात आला असून, अभिनेत्याला अटक करण्याची मागणी केली आहे.

कोण आहे अभिनेता गौरव बक्षी?

मूळचे दिल्लीचा रहिवासी असणारा गौरव बक्षी सध्या ताळगावात वास्तव्य करतात अशी माहिती आहे. बक्षीच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर त्यांनी केलेल्या विविध अॅडफिल्मचे स्क्रिनशॉट आणि इतर अभिनेते, अभिनेत्रींसोबतचे फोटो आहेत.

Minister Nilkanth Halarnkar And Actor Gaurav Bakshi
Goa: गोवा माईल्स आणि स्थानिक टॅक्सी चालकांमध्ये तुंबळ हाणामारी, आमदाराच्या घरासमोरच राडा

बक्षी यांचा आरोप काय?

गौरव बक्षी रेवोडा पंचायतीत कामानिमित्त आले असता मंत्र्यांची कार रस्त्यातच उभी होती. चालकाला कार बाजुला घेण्यास सांगितले असता त्यांने कार बाजुला न घेता वाद घालण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com