Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सासष्टीत ‘हाऊजी’च्या नावावर जुगार, लाखोंच्या बक्षिसांची उलाढाल; निर्देश नसल्याने पोलिस हतबल

Housie gambling Goa Salcete: कोलवाचे पोलिस निरीक्षक रितेश तरी यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही आयोजकांना हाऊजी गेम बंद ठेवण्यास बजावले असलल्याचे सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Housie game legality Goa

मडगाव:  ‘हाऊजी गेम’ने आता जुगाराचे रूप धारण केले असून सासष्टीतल्या किनारपट्टी भागात हे लोण पसरले आहे. याबाबत आजवर धृतराष्ट्राची भूमिका घेतलेल्या पोलिस यंत्रणेला आता खडबडून जाग आली असून हे प्रकार बंद करण्यासाठी संबंधितांनी पावले उचलली आहेत. 

वार्का येथे नृत्य रजनीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात ग्रँड हाऊजी ६ लाख रुपये, फूल हाऊजी ५ लाख अशी बक्षिसे ठेवली होती तर नवेली येथेही एका कार्यक्रमासाठी १५ लाखांपर्यंतची बक्षिसे ठेवली होती. 

दरम्यान, कोलवा पोलिसांनी हाऊजी गेमच्या आयोजकांना बोलावून त्यांना हाऊजी गेम प्रकार बंद ठेवण्यास बजावले आहे. मात्र या गेम बंद करण्यासाठी सरकारकडूनही कुठलेही निर्देश न आल्याने पोलिसही हतबलता दाखवितात. 

कोलवाचे पोलिस निरीक्षक रितेश तरी यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही आयोजकांना हाऊजी गेम बंद ठेवण्यास बजावले असलल्याचे सांगितले. या गेमबद्दल तसेच ठेवण्यात आलेल्या बक्षिसांबाबत सरकारकडून परवानगी घेतली आहे का, असेही आयोजकांना विचारण्यात आले, मात्र ते कोणताही कागदोपत्री पुरावा सादर करू शकले नाहीत असेही त्यांनी सांगितले. कोलवा पोलिस ठाण्याच्या अख्यत्यारित असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचेही ते म्हणाले.

आयकर करणार कारवाई

याबाबत आयकर खात्याचे वरिष्ठ अधिकारी सुनीत कुमार निराली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आयकर विभागाच्या प्रधान संचालकांना कळविले जाणार असून कर चुकवेगिरीबाबत तक्रार दाखल केली जाणार असल्याचे सांगितले.

आयकर कायदा १९६१ कलम ५६ (२) नुसार लॉटरी व गेममधून मिळालेले उत्पन्न इतर उत्पन्न प्राप्तीतून मिळविलेले ठरते, असे त्यांनी सांगितले.

युवकांत ‘हाऊजी’चे आकर्षण

नृत्य रजनी व तेथे हाऊजी गेमवर ठेवली जाणारी लाखो रुपयाची बक्षिसे  तरुणाईंना आकर्षित करीत असतात. सोशिअल मिडियावरून त्याची जाहिरात केली जाते. या प्रकाराला आळा घालावा व कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT