Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

Ramesh Tawadkar : कुडतरीतही 3 गरजूंना बांधून देणार घरे

Ramesh Tawadkar : सभापती तवडकर : सात विद्यालये व दोन पंचायतींना संगणक वितरित

दैनिक गोमन्तक

Ramesh Tawadkar : गरिबी काय असते हे मी अनुभवलेले आहे. आम्ही बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने काणकोणात अवघ्या तीन महिन्यांत 20 घरे गरीब गरजवंतांना प्रदान केलेली आहेत. यापुढे गरीब गरजवंतांना 100 घरे बांधून देण्यात येणार आहेत.

जानेवारी 2024 पासून या कामाला सुरवात केली जाणार आहे. एस्. टी. मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोझा यांच्या विनंतीनुसार कुडतरी मतदारसंघात तीन घरांचे बांधकाम सुरू करण्याचा विचार आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

भाजप अनुसूचित जमातीच्या मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोझा यांच्या वाढदिवसानिमित्त ऊर्जा प्रशिक्षण आणि संशोधन अकादमीतर्फे आयोजित मोफत संगणक वितरण कार्यक्रमाचे शुक्रवारी आर्लेम-राय येथे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री चर्चिल‌ आलेमाव‌, नावेली हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिबिया, डॉ. आर्नेस्‍ट रॉड्रीगीस, चौगुले उद्योग समूहाच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तेजस्‍वी पै, ऊर्जा अकादमीच्‍या संस्‍थापक डॉ. स्नेहा भागवत, मनोरा क्लबचे अध्यक्ष श्रीकांत सावंत, एसटी मोर्चाचे चेअरमन अरविंद खुंटकर, अँथनी बार्बोझा आदी उपस्थित होते.

या निमित्ताने मतदार संघातील 7 विद्यालये व 2 पंचायतीना कॉम्प्युटरचे वितरण सभापती तवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

अँथनींच्‍या मागे उभे रहा : चर्चिल

अँथनी बार्बोझा हे लोकांची कामे करणारे कार्यकर्ते आहेत. ते इतर राजकारण्‍याप्रमाणे लोकांना विसरणारे नाहीत. कुडतरीमध्‍ये राजकीय बदल घडवून आणायचा असेल तर बार्बोझा यांच्‍या मागे लोकांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन चर्चिल आलेमाव यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT