Wall Collapses At Navelim, Damaged Bike Dainik Gomantak
गोवा

Wall Collapses At Navelim: कुंपणाची भिंत कोसळून नावेलीत दुचाकीचे नुकसान

Navelim: भिंत तकलादू असल्‍याने कालच्‍या पावसात कोसळली आणि शेजाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले

गोमन्तक डिजिटल टीम

एका बांधकाम कंत्राटदाराने उभारलेली कुंपणााची भिंत काल कोसळल्याने दुसऱ्या घराचे नुकसान झाले. या भिंतीच्‍या दगडाखाली एक दुचाकी सापडल्‍याने त्‍या दुचाकीचीही मोडतोड झाली.

गावकरमड्डी-नावेली येथे ही दुर्घटना काल रात्री घडली. या भागात एक जुने घर असून या घराच्‍या बाजूलाच आणखी एक बांधकाम उभे होत आहे. हे बांधकाम करण्‍यासाठी एक दहा फूट उंच भिंत उभारली होती. मात्र ही भिंत तकलादू असल्‍याने कालच्‍या पावसात ती कोसळली आणि शेजाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्‍हो यांनी दिली.

कुंपणाची भिंत ही भिंत दहा मीटर उंच बांधली होती. ती बांधताना पंचायतीकडून कुठलाही परवाना घेतला नव्‍हता. एवढी मोठी भिंत बांधली तर ती कोसळू शकते, याची कल्‍पना बांधकाम कंत्राटदाराला दिली असतानाही त्‍याने त्‍याकडे दुर्लक्ष केले. त्‍यामुळेच ही दुर्घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT