Mayem Assonora House Fire Dainik Gomantak
गोवा

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

Mayem Assonora House Fire: शनिवारी रात्री उशिरा मयते-अस्नोडा परिसरात एका घराला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

शनिवारी रात्री उशिरा मयते-अस्नोडा परिसरात एका घराला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत घराच्या स्टोअर रूममध्ये ठेवलेले शिलाई मशीन, कपडे आणि इतर महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु घरमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग 'शॉर्टसर्किट'मुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्यरात्री अचानक भडकला अग्नीतांडव ,मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सर्व कुटुंबीय झोपण्याच्या तयारीत असताना किंवा झोपलेले असताना अचानक घराच्या स्टोअर रूममधून धूर निघू लागला. काही वेळातच आगीनेरौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण खोलीला आपल्या कवेत घेतले. खोलीत कपडे आणि इतर ज्वलनशील वस्तू असल्याने आग वेगाने पसरली. आग लागल्याचे समजताच घरातील सदस्यांनी एकच गोंधळ केला आणि तात्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

३ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक ,या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या स्टोअर रूममध्ये घरगुती वापराच्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या शिलाई मशिन्स, मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेले कपडे आणि इतर मौल्यवान सामान होते. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण खोलीतील साहित्य जळून कोळसा झाले. प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत सुमारे ३ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा ऐवज पूर्णपणे नष्ट झाला आहे.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

वीज पुरवठ्यातील बिघाड ठरला कारणीभूत: घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. स्टोअर रूममधील वीज जोडणीत अचानक झालेल्या 'शॉर्टसर्किट'मुळेच ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT