Goa Fire Dainik Gomantak
गोवा

Bicholim Goa Fire: डिचोलीत घराला आग; कपडे, दागिने खाक

आठ लाखांची हानी: लग्न सोहळ्याच्या तयारीवेळीच कोसळली आपत्ती

गोमन्तक डिजिटल टीम

House on Fire in Bicholim Goa: डिचोली शहरातील बंदरवाडा येथे एका घराला आग लागून, या आगीत कपडेलत्यासह वस्तूंसह सुवर्णालंकार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही घटना काल (बुधवारी) घडली. या घटनेत लक्ष्मण हत्तीरीगर कुटुंबीयांचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले.

ही आग नेमकी कशी लागली, हे स्पष्ट झाले नसले, तरी घराच्या मागच्या बाजूने पेटविलेल्या आगीची ठिणगी उसळून ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.घराला आग लागल्याचे लक्षात येताच, घरातील बायका-मुलांनी घराबाहेर धाव घेतली.

डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच दलाचे अधिकारी शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तोवर अर्धेअधिक घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

लग्नाच्या तयारीवेळीच आपत्ती

प्राप्त माहितीनुसार हत्तरीगर यांच्या मुलीचे लग्न ठरले आहे. पुढील पंधरा दिवसात कर्नाटकात लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्न सोहळ्याची तयारी चालू होती. वधूसाठी सोन्याचे दागिनेही तयार करून आणले होते.

अन्य ऐवजासह हे दागिने आगीत वितळून गेले, असे सांगून सुनंदा हत्तरीगर यांनी या आपत्तीमुळे आमच्यावर मोठे संकट ओढवले आहे, असे सांगितले.

कपडेलत्ते, दागिने जळाले

मूळ कर्नाटक येथील हत्तरीगर कुटुंब गेल्या बऱ्याच वर्षांपासून बंदरवाडा येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या घराला लागलेल्या आगीत घरातील सोन्याचे दागिने, महत्वाची कागदपत्रे, कपडेलत्ते आदीं महत्वाचा ऐवज जळून खाक झाला. या घटनेमुळे हत्तरीगर कुटुंब मोठ्या संकटात सापडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT