Shacks Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्यातील 'किनारे' रिकामेच? ऐन हंगामात कमी पर्यटक; Beach Shack ना 'या' तारखेपर्यंतच परवानगी

Goa Beach Shack: पर्यटन हंगाम असूनही दक्षिण गोव्यात पर्यटकांची संख्या रोडावली आहे. पर्यटन खात्याच्या परवानगीने घातले जाणारे शॅक १० जूनपूर्वी काढावे लागणार आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism Slowdown Beach Shacks to Be Removed by June 10th

सासष्टी: पर्यटन हंगाम असूनही दक्षिण गोव्यात पर्यटकांची संख्या रोडावली आहे. अपेक्षेपेक्षा खूपच कमी संख्‍येने पर्यटक असल्‍याने हॉटेलांचे आरक्षणसुद्धा कमी झाले आहे. त्यामुळे लहान व मध्यम हॉटेल असोसिएशनच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष संतोष दिवकर यांनी सांगितले की, दक्षिण गोव्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काय उपाययोजना आखणे आवश्यक आहे, याबाबत सर्वसमावेशक श्‍‍वेतपत्रिका तयार करणार आहे. तिचा मसुदा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना सादर केला जाईल. उत्तर गोव्‍यात मोपा विमानतळ सुरू झाल्यापासून दक्षिण गोव्यातील पर्यटकांची संख्‍या रोडावत चालली आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दरम्‍यान, गेले चार महिने दक्षिण गोव्यातील हॉटेल्‍सना आव्हानात्मक ठरलेले आहेत, असे असोसिएशनचे उपाध्यक्ष डिक्सन वाझ यांनी सांगितले. संगीत कार्यक्रमांना द्यावे लागणारे ज्यादा शुल्क, त्‍यावर घातलेले निर्बंध यामुळेसुद्धा हॉटेल क्षेत्रावर परिणाम होताना दिसत आहे, असेही ते म्‍हणाले.

१० जूनपूर्वी शॅक न हटविल्यास पालिका, पंचायतींतर्फे कारवाई

राज्याच्या किनाऱ्यावर पर्यटन खात्याच्या परवानगीने घातले जाणारे शॅक दरवर्षी १० जूनपूर्वी काढावे लागणार आहेत. ते काढले न गेल्यास स्थानिक पंचायत, पालिका किंवा पणजी महापालिका आपल्या हद्दीतील ते शॅक आठवडाभरात हटवतील. याचा खर्च मात्र परवानाधारकाकडून वसूल केला जाणार आहे. गोवा सार्वजनिक किनाऱ्यावर शॅकची उभारणी करणे कायदा राज्यात लागू झाला आहे.

कायद्यातील तरतुदीनुसार दरवर्षी १५ सप्टेंबरपासून पुढील वर्षी ३१ मे पर्यंत शॅकमध्ये व्यवसाय करता येईल. पंचायत, पालिका किंवा महापालिकेचा ‘ना हरकत’ दाखला, पंचायत, पालिका किंवा महापालिकेने जारी केलेला व्यापार परवाना, आरोग्य खात्याचा ना हरकत दाखला, अग्नीशमन दलाचा परवाना, अबकारी परवाना हवा. शॅकची उंची जास्तीत जास्त ९ मीटरपर्यंत असू शकते आणि भूखंडाच्या सीमेपासून चारही बाजूने १ मीटर अंतर सोडणे आवश्यक करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अंदमानमध्ये भारतीय तटरक्षक दलाकडून तब्बल 5 टन अमलीपदार्थ जप्त

Ranbir Kapoor at IFFI 2024: आलियाने विचारलं" किशोर कुमार कोण आहे?" रणबीरने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; Video Viral, चाहते नाराज

Corgao: सरपंच निवड हा पंचायतीचा विषय! कोरगाववासीय नाईक यांच्या पाठीशी; धार्मिक वादाला विरोध

Her Story Her Screen महिला सबलीकरणाला समर्पित! IFFI चे सकारात्मक पाऊल

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

SCROLL FOR NEXT