stray dogs  Dainik Gomantak
गोवा

Stray Dog: कुत्र्याच्या अंगावर ओतले गरम पाणी!

Stray Dog: अज्ञाताविरुद्ध तक्रार: क्रूरतेची अन्य एक घटना

दैनिक गोमन्तक

Stray Dog: जंगली प्राण्याच्या शिकारीसाठी ठेवलेल्या गावठी बाँबचा स्फोट होऊन एका रानटी डुकराचे तोंड फुटल्याची घटना ताजी असतानाच कोलवा येथील एका पाळीव कुत्र्यावर अज्ञाताने उकळलेले पाणी ओतण्याचा प्रकार घडला आहे.

या घटनेमुळे कुत्रा भाजून गंभीर जखमी झाला असून त्याच्या अंगावरील चामडी अक्षरशः लोंबकळत आहे. या अमानुष कृत्य करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध कोलवा परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत पाळीव कुत्र्यावर गरम पाणी ओतण्याचा हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी फिडोल नामक महिलेने कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कुत्र्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षकांनी सांगितले. प्राणिमित्रांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्राण्यांवरील हल्ले निंदनीय

साकोर्डा - धारबांदोडा येथे शिकारीसाठी पेरलेल्या गावठी बाँबच्या स्फोटात काल रानडुक्कराचे तोंड फुटून जखमी होण्याची घटना घडली होती. त्यानंतर आज कोलवा येथे पाळीव कुत्र्यावर उकळलेले पाणी ओतण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे प्राणीप्रेमींत हळहळ व्यक्त केली जात आहे. माणसाकडून पाळीव प्राणी व जंगली प्राण्यांवर होणारे हे हल्ले निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT