फातोर्डा: मडगावचे (Margao) पोर्तुगीज कालीन हॉस्पिसियो इस्पितळाला (Hospice Hospital) मोठो इतिहास आहे. त्यामध्ये अनेक गोमंतकीयांच्या भावना गुंतलेल्या आहेत. त्यामुळे या इस्पितळाचे बांधकमा मोडकळीस आलेले असले व त्यातील कित्येक विभाग नव्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात (Goa District Hospital) स्थलांतरीत केले असले तरी या वास्तुची केंद्र सरकारच्या निधीतुन पुर्ण दुरुस्ती केली जाईल व येथे केवळ आरोग्य सेवेलाच प्राधान्य दिले जाईल असे आरोग्यमंत्री विश्र्वजीत राणे (Health Minister Vishwajeet Rane) यानी मडगावी भेट दिली त्यावेळी सांगितले. या इस्पितळाची केंद्र सरकारच्या निधीतुन दुरुस्ती करण्याची परवानगी सरकारने आरोग्य खात्याला दिली आहे.व दुरुस्तीनंतर येथे केवळ आरोग्य सेवाच चालु राहील. या इस्पितळाचे संग्रहालयात निश्र्चितच रुपांतर केले जाणार नाही याची ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली.
या इस्पितळाची जुनी ओळख राखली जाईल. तेथे मोती डोंगरावरील टी. बी. इस्पितळातील कल्याण केंद्र व पुनर्वसन केंद्र सुरु केले जाईल असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. हॉस्पिसियो इस्पितळ हे कल्याण, पुनर्वसन व मुलांसाठीच्या उपचारासाठीचे चांगले केंद्र होऊ शकेल असे आरोग्य संचालिका डॉ. आयरा आल्मेदा यानी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.