Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Underage Girls Assault : ईदच्या पार्टीला बोलावून मित्राने घात केला, बर्थडे केक कापून 2 बहिणींसह एका अल्पवयीन मुलीवर दोघांकडून बलात्कार

Goa Crime News: हॉटेलमध्ये चौकशी करता असे दिसून आले की दोन्ही संशयितांनी हॉटेलमध्‍ये दोन वेगवेगळ्या खोल्‍या आरक्षित केल्‍या होत्‍या.

Pramod Yadav

पणजी: ईद साजरी करण्यासाठी आमंत्रण देऊन दोघांनी तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (०७ जून) कळंगुट येथे उघडकीस आली. याप्रकरणी आगशी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी हॉटेल सील करुन हॉटेलचा मालकाला देखील अटक केली आहे.

अल्ताफ मेहबूब मुजावर (१९) व ओम विनय नाईक (२१) (दोघेही रा. पर्वरी) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तसेच, हॉटेल मालक रजत चव्हाण (रा. हरियाणा) याला देखील अटक करण्यात आली आहे. पालकांच्या परवानगीशिवाय कोणतीही खातरजमा न करता अल्पवयीन मुलींना प्रवेश दिल्याने हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी संशयित मेहबूब मुजावर याची १५ वर्षीय मुलीशी सोशल मिडियावरुन ओळख झाली. दोघांमध्ये संवाद वाढला. संशयिताने मुलीला ईदच्या पार्टीसाठी आमंत्रण दिले. मुलीने घरातून बाहेर पडताना सोबत १३ वर्षीय लहान बहीण आणि ११ वर्षीय मैत्रिणीला देखील सोबत घेतले.

संशयित मेहबूब आणि त्याचा मित्र ओम यांनी कळंगुट येथील हॉटेलमध्ये एक रुम बुक केली होती. याचदिवशी १५ वर्षीय पीडित मुलीचा वाढदिवस होता. सर्वांनी हॉटेलवरती तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानंतर संशयित मेहबूबने तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला आहे. तर, त्याचा मित्र ओम याने इतर दोन मुलींवर आळपाळीने बलात्कार केल्याचे आरोपात म्हटले आहे.

याप्रकरणी पीडित १५ वर्षीय मुलीच्या कुटुंबियांनी आणि ११ वर्षीय मुलीच्या नातेवाईंकांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कळंगुट येथून तिन्ही मुलींची सुटका करुन, दोघांना अटक केली आहे. कळंगुट पोलिसांनी हॉटेल मालक रजत चव्हाण याला देखील अटक केली आहे.

तसेच, हॉटेलचा मॅनेजर मन्सूर शफी पीर (रा. जम्मू काश्मीर) याच्याविरोधात देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हॉटेल सील करुन त्याचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Boat In Raigad: रायगडच्या समुद्रात 'पाकिस्तानी बोट'? काही लोक बोटीतून उतरल्याचा संशय, पोलिसांची धावपळ

Goa Politics: ...अन्यथा 2027 च्या निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील, गोमंतक गौड मराठा समाजाचा सरकारला इशारा

Goa Dairy: गोवा डेअरीतील दूध आधारभूत रक्कम 30 जुलैपर्यंत; शिरोडकरांचे आश्वासन

Akash Deep: वडील-भाऊ कोरोनात गेले, बहिण कॅन्सरशी लढतेय; दुःखाचं ओझं बाजूला ठेवत एजबॅस्टनवर आकाश दीपचा 'दीप' तेवला

Goa Opinion: शेकडो कोटी खर्च केले, पण समस्या कायम! गोव्यात विकास होतोय की विकासाचा अतिरेक?

SCROLL FOR NEXT