Holy Family House: '24 तासांत होली फॅमिली हाऊस रिकामे करा'! मडगावातील धोकादायक इमारतीवर जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई

Holy Family House Margao: इमारतीतील व्यावसायिक आस्थापने आणि रहिवाशांनी २४ तासांच्या आत जागा रिक्त करावी, असे स्पष्ट आदेश दिले आहेत
Margao demolition order
Margao demolition orderDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण गोव्यातील मडगाव शहरात एका धोकादायक इमारतीवरून सुरू असलेल्या चिंतेला आता पूर्णविराम लागलाय. मडगाव येथील सिने लता परिसरातील 'होली फॅमिली हाऊस' ही इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष एग्ना क्लीटस यांनी इमारतीतील व्यावसायिक आस्थापने आणि रहिवाशांनी २४ तासांच्या आत जागा रिक्त करावी, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

वारंवार कोसळणारे भाग आणि वाढती भीती

'होली फॅमिली हाऊस' इमारतीचा काही भाग यापूर्वी दोन वेळा कोसळला आहे, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. २४ मे २०२५ रोजी इमारतीच्या बाल्कनीचा एक भाग पहिल्यांदा कोसळला. त्यानंतर, अवघ्या काही दिवसांतच १० जून रोजी रात्री पुन्हा एकदा इमारतीचा काँक्रीटचा भाग खाली पडला.

या दोन्ही घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि जिल्हा प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करावा लागला. फातिमा प्रीसी आंताव यांनी सादर केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात इमारतीची स्थिती अत्यंत जीर्ण असून, ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.

Margao demolition order
Goa Assembly Monsoon Session 2025: विधानसभेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलैपासून; कार्यकाळ अद्याप गुलदस्त्यात, CM सावंत म्हणाले, "पुढील प्रक्रियेनंतरच निर्णय"

इमारतीचे स्लॅब्स, बाल्कनी आणि व्हरांड्यांमधून सतत काँक्रीटचे तुकडे खाली पडत असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

प्रशासनाची कठोर पावले आणि सुरक्षा उपाययोजना

या गंभीर पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मामलेदारांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. यामध्ये संपूर्ण इमारत त्वरित रिकामी करून, तिचे प्रवेशद्वार आणि पायऱ्या सील करण्यास सांगितले असून मडगाव पोलिसांना घटनास्थळी योग्य बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. वाहतूक पोलिसांनी परिसरात कोणतेही वाहन उभे राहणार नाही याची खात्री करावी, तसेच परिसरात चेतावणी फलक लावून इमारतीला घेराव घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या संपूर्ण मोहिमेची अंमलबजावणी स्थानिक नगरपालिकेच्या समन्वयाने करण्यात येणार आहे. अंमलबजावणीनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. सदर इमारतीमध्ये काही व्यावसायिक आस्थापनेही कार्यरत होती, पण सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यावश्यक ठरली असल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com