Goa GMC Issue: "कारवाई करण्याची हिंमत नाही" राणेंना संरक्षण दिल्याचा काँग्रेसचा आरोप; सरकार बरखास्तीची मागणी

Vishwajit Rane GMC controversy: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्र्यांना संरक्षण दिल्याचा काँग्रेसचा थेट आरोप
Congress slams Goa government
Congress slams Goa governmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) मधील मेडिकल ऑफिसर डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीवरून सुरू असलेला वाद मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्तक्षेपांनंतर शामला. मात्र आता या प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्र्यांना संरक्षण दिल्याचा थेट आरोप करत, गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

'मुख्यमंत्र्यांमध्ये कारवाईची हिंमत नाही!' - अमित पाटकर

अमित पाटकर यांनी गुरुवारी (दि.१२) रोजी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात त्यांच्या मंत्र्यांविरोधात कारवाई करण्याची किंवा त्यांना पदावरून काढून टाकण्याची हिंमत नाही."

Congress slams Goa government
Goa GMC Issue: "तू मंत्र्यांचो चमचो" आंदोलक डॉक्टरांचा डीनविरोधात भडका; हमरीतुमरीमुळे CM सावंतही झाले अवाक!

डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांचा सार्वजनिकरित्या अपमान करणाऱ्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले असल्याचा घणाघाती आरोप पाटकर यांनी केलाय.

पाटकर यांनी पुढे म्हटले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे आणि भ्रष्टाचाराची लाट उसळली आहे. या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त करत, पाटकर यांनी राज्यपालांना मध्यस्थी करून हे सरकार बरखास्त करण्याची विनंती केली आहे.

काँग्रेस निवडणुकीसाठी सज्ज, देणार नवे चेहरे

याचवेळी, काँग्रेस पक्ष कोणत्याही क्षणी निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे अमित पाटकर यांनी स्पष्ट केले. "आम्ही राज्याला नवीन चेहरे देऊ," असे सांगत त्यांनी आगामी काळात काँग्रेस जनतेसमोर एक मजबूत पर्याय म्हणून उभे राहील, असा विश्वास दाखवला आहे.

अखेर संप घेतला मागे!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकल्या आणि त्यानंतर या वादाला पूर्णविराम लावला. मुख्यमंत्री, जीएआरडी, जीएमसी डीन आणि जीएमसी प्राध्यापकांमध्ये झालेल्या बैठकीनंतर जनहितासाठी संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आंदोलकांनी माध्यमांना दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com