Fonda Pocso Court Case Dainik Gomantak
गोवा

Fonda Pocso Court Case: लग्नाचे खोटे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार! 22 वर्षीय तरुणावर; पॉक्सो कलम 376 अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे कोर्टाने आदेश दिले

Marriage Promise Sexual Assault Case: सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, २०२३ ते मे २०२५ या कालावधीत आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आश्वासन देत बोरी-फोंडा परिसरात तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: लग्नाचे खोटे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो न्यायालयाने फोंडा येथील रामेश्वर तांबडे (२२) याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, २०२३ ते मे २०२५ या कालावधीत आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आश्वासन देत बोरी-फोंडा परिसरात तिच्यावर वारंवार अत्याचार केले. भावनिक विश्वास संपादन करून लवकरच विवाह करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आरोपीने तिला टाळण्यास सुरुवात केली आणि अखेरीस लग्नास स्पष्ट नकार दिला.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने पीडितेचा जबाब, वैद्यकीय अहवाल आणि पंचनामा यांचा विचार केला. उपलब्ध पुराव्यांवरून प्रथमदर्शनी पीडितेने केवळ लग्नाच्या आश्वासनाच्या विश्वासावर शारीरिक संबंधांना संमती दिल्याचे दिसून येते, असे न्यायालयाने नमूद केले.

दोन वर्षांच्या कालावधीत ही संमती स्वेच्छेने होती की केवळ विवाहाच्या आश्वासनावर आधारित होती, हा मुद्दा पीडितेची साक्ष नोंदविल्यानंतर अधिक स्पष्ट होईल. मात्र, आरोप निश्चित करण्याच्या प्राथमिक टप्प्यावर पीडितेच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणे आवश्यक असून, तिच्या वर्तनाबाबत तर्क-वितर्क लावणे किंवा शंका उपस्थित करणे योग्य ठरणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT