honey news  dainikgomantak
गोवा

Goa News : शास्त्रशुद्ध मधमाशी पालन शेतकऱ्यांना वरदान

शास्त्रज्ञ प्रभू : आयुर्वेदानुसार निरोगी आरोग्यासाठी आहारात मधाचा वापर आवश्‍यक

अनिल पाटील

पणजी : सृष्टीचक्रात मधमाशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बहुतांश वनस्पतींच्या परागीकरणासाठी उपयुक्त मधमाशा आरोग्यासाठी वरदान असलेला मधही गोळा करतात. त्याचे शास्त्रशुद्ध पालन करून मिळविलेला मध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. यासाठी जुने गोवे येथील आयसीएआर - कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी अनुदानासह इतर माहिती आणि प्रोत्साहन दिले जाते, अशी माहिती केंद्राचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ एच.आर.सी. प्रभू यांनी दिली आहे. 

 डॉ. प्रभू म्हणाले, या केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबविले जातात. त्यापैकी मधमाशी पालन प्रकल्प आता शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. यासाठी राज्यातील अनेक शेतकरी पुढे येत असून ते शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवसाय करत आहेत. नागरिकांना आरोग्यासाठी आवश्यक असलेला मधही यातून मिळत आहे. शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाबरोबर व्यवसायासाठी आवश्यक साधनांसाठी अनुदान आणि इतर मार्गदर्शनही केले जात आहे.

तीन प्रकारच्या माशा

या पाळीव पेट्यांमध्येही राणीमाशी, कामकरी माशी आणि नरमाशी अशा तीन प्रकारच्या माशा असतात. राणीमाशीचे आयुर्मान हे तीन वर्षांचे तर कामकरी माशा या दीड ते दोन महिने जगतात. पेटीत राणीमाशीची भूमिका महत्त्वाचे असते. आणि संपूर्ण पेटीमध्ये केवळ एकच राणीमाशी असते. फुलांमधून गोळा केलेल्या शर्करा रसामध्ये ८५ टक्के  शर्करा आणि १५ टक्के पाणी असते. नंतर या माशा पंखांच्या साहाय्याने वारा घालून पाणी आणि मध वेगळे करतात.

एका पेटीतून १० लिटर मध

मधमाशी पालन व्यवसाय शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास वर्षाकाठी एका पेटीतून साधारणपणे दहा लिटर मध मिळतो. सध्या एक लिटर मधाचा दर ६०० रुपये आहे. एक शेतकरी २५ पेट्यांची योग्यरितीने निगा आणि व्यवस्थापन करू शकतो. शेतकऱ्यांसाठी  आणि शेतीसाठी हा दुहेरी पूरक व्यवसाय आहे.

जानेवारी ते जून हंगाम : मधमाशांचा प्रामुख्याने जानेवारी ते जून हा मुख्य हंगाम असतो. या काळात नैसर्गिकदृष्ट्या वनस्पतींची फुले मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे या काळात या पाळलेल्या मधमाशा सर्वाधिक मध गोळा करतात. यादरम्यानच्या काळात फुलांच्या नैसर्गिक परागीकरणासाठी ही या मधमाशा उपयुक्त आहेत, असे डॉ. प्रभू म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT