Stray Animals Dainik Gomantak
गोवा

Valpoi: शेणावरून घसरून 2 विद्यार्थी जखमी भुईपाल रस्ता बनलाय गुरांचा अड्डा; अपघातांच्या संख्येत वाढ

Valpoi Stray Cattles: या मार्गावर प्रचंड प्रमाणात भटक्या गुरांचा उच्छाद मांडलेला असतो. तो रात्रभर व सकाळपर्यंत दिसून येतो आहे. त्यामुळे वाहनचालकांना बरीच कसरत करीत वाट काढून जावे लागते.

Sameer Panditrao

वाळपई: होंडा ते वाळपई मुख्य रस्ता सध्या वाहन चालकांसाठी अत्यंत त्रासदायक ठरलेला आहे. या मुख्य मार्गावरील भुईपाल येथील एसीजीएल कंपनीच्या बस बांधणी कंपनीसमोरील मुख्य रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणावर भटक्या गुरांचा संचार असतो.

त्यावेळी रस्त्यावर पडलेले गायींचे शेण अपघातास निमंत्रण बनले आहे. सोमवारी सकाळी भुईपाल येथे अशाच रस्त्यावर पडलेल्या शेणावरून घसरून दोन विद्यार्थी जखमी होण्याचा प्रकार घडला आहे. रस्त्यावर या ठिकाणी रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर गुरे ठाण मांडून असतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शेण पडून रहाते.

सायंकाळ झाली की या मार्गावर प्रचंड प्रमाणात भटक्या गुरांचा उच्छाद मांडलेला असतो. तो रात्रभर व सकाळपर्यंत दिसून येतो आहे. त्यामुळे वाहनचालकांना बरीच कसरत करीत वाट काढून जावे लागते. प्रसंगी रस्त्यावर बसलेली गुरे उठत देखील नाहीत. अनेकवेळा हॉर्न वाजविल्यावर गुरे बाजूला सरकतात.

त्यामुळे मोठी वाहने, दुचाकी यांची बरीच त्रेधातीरपीट होते. पावसाळ्यात तर दुचाकी चालकांना मुसळधार पावसावेळी रात्रीच्यावेळी समोरील गुरांचा अंदाज येत नाही. प्रसंगी स्वयंअपघात होऊन चालकांना हाता पायांना दुखापत देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

गुरांच्या मालकावर कारवाईची मागणी

प्रत्येक स्थानिक पंचायतीने रस्त्यावरील भटक्या गुरांची पाहणी करून सरकारी योजनेतून घेतलेली कोणती गुरे भटकत आहेत याचे सर्वेक्षण करून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. सरकारी योजनेतील किंवा नोंदणी असलेल्या गुरांच्या कानाला बिल्लावर नंबर लावलेला असतो. त्यासाठी आता पंचायतींनी कार्यवाही करावी, अशी लोकांची मागणी आहे.

गुरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

सत्तरी तालुक्यातील विविध भागात दिवसेंदिवस भटक्या गुरांची समस्या जटील होत चालली आहे. त्यातच आता गोवंश चोरी होण्याची भीतीही वाढली आहे. होंडा भागात भटक्या गुरांची संख्या वाढत असून रस्त्यावर फिरणारा भटका गोवंश त्रासदायक आहेच.

शिवाय त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. होंडा वाळपई मार्गावर दररोज होंडा वडाकडे, बसस्थानक, बाजार, भुईपाल, बस बांधणी प्रकल्प परिसर, सालेली जंक्शन, रेडीघाट या भागात असंख्य प्रमाणात गुरांचा मोठा संचार असतो. दोन मोकाट गुरे आपापसात भांडताना वाहनचालकांना अपघात होण्याचे प्रकार होत आहेत. त्यात गुरेही जखमी होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांना अखेरची मानवंदना! गोव्यात तीन दिवसांचा दुखवटा, एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर

Goa AAP: सासष्टीत 9 मतदारसंघांत ‘आप’ देणार उमेदवार! काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्याची तयारी; गोवा फॉरवर्डही रिंगणात

नव्वदमध्ये गोव्यातील गुन्हेगार रवींच्या नावाने थरथर कापत होते; महाराष्ट्रापर्यंत पोहोचला होता दबदबा

अग्रलेख: दरोडेखोरांना गोव्‍यात साह्य कुणी केले?

Goa Today's News Live: गोव्यात एक दिवसाची शासकीय सुट्टी; तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर

SCROLL FOR NEXT