Honda Industrial Estate Dainik Gomantak
गोवा

Honda Industrial Estate : होंडा औद्योगिक वसाहतीतील गटार व्यवस्थेचे तीनतेरा; सुविधांचा अभाव

रस्त्यांवर साचते पावसाचे पाणी; पथदीप बंदच

गोमन्तक डिजिटल टीम

Honda Industrial Estate : पिसुर्ले,पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा औद्योगिक वसाहतीत सुविधांचा अभाव जाणवत असल्याने कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सध्या या भागात परतीचा पाऊस पडत असल्याने औद्योगिक वसाहतीमधील गटार व्यवस्था कोलमडून गेली आहे. त्यामुळे आज पडलेल्या पावसामुळे औद्योगिक वसाहतीमधील सर्व पाणी रस्त्यांवरून वाहून नवनाथ मंदिराजवळ असलेल्या प्रिया नाटेकर यांच्या दुकानात व घरांत पाणी शिरून बरेच नुकसान झाले आहे.

या वसाहतीच्या प्रवेशद्वारावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण अपघातानंतर या वसाहतीत बऱ्याच असुविधा असल्याचे प्रकरण समोर आले आहे.

यामध्ये संपूर्ण वसाहतीच्या परिसरात रात्रीच्यावेळी पथदीपांची व्यवस्था नसल्याने तेथे काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. त्यात काही ठिकाणी असलेले पथदीप बऱ्याच दिवसांपासून पेटत नसल्याने कामगारांना रात्रपाळी करणे अवघड बनले आहे.

ही वसाहत काही प्रमाणात वरच्या भागात असल्याने पावसाळ्यात वसाहतीतील संपूर्ण पाणी होंडा - वाळपई दरम्यानच्या रस्त्यांवरून वाहत असते.

त्याचा परिणाम या रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या वाहनांना तसेच नागरिकांना होत आहे. या वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोर प्रिया नाटेकर या महिलेचे घर असून औद्योगिक वसाहतीमधील सर्व पाणी रस्त्याच्या आरपार होऊन नाटेकर यांच्या घरात शिरत आहे.

समस्या सोडविण्याची मागणी

औद्योगिक वसाहतीजवळ घातलेल्या गतिरोधकामुळे संपूर्ण पाणी होंडा - वाळपई रस्त्यावर येत आहे. त्याचप्रमाणे या वसाहतीत गेल्या कित्येक दिवसांपासून पथदीप पेटत नाहीत.

यासंबंधी कोणीच दखल घेत नाही. याचा त्रास रात्रीच्यावेळी कामावर जाणाऱ्या कामगारांना होत आहे. या प्रकरणी औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT