Honda house fire Dainik Gomantak
गोवा

Honda Fire News: ..आग भडकली आणि सोनेनाणे, कागदपत्रे जळाली! होंड्यातील दुर्दैवी घटना; ज्येष्ठ महिलेचे लाखोंचे नुकसान

Honda Fire Incident: होंडा औद्योगिक वसाहतीतील ज्येष्ठ महिला शेवंती माईणकर यांच्या राहत्या घराला आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.

Sameer Panditrao

वाळपई: होंडा औद्योगिक वसाहतीतील ज्येष्ठ महिला शेवंती माईणकर यांच्या राहत्या घराला आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत सुमारे १.६० लाखांचे साहित्य खाक झाले असून ५ लाखांची मालमत्ता वाचवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी ती घराच्या पाठीमागील स्वयंपाकघरातील खोलीत प्रथम आग लागून ती पुढे पसरली. त्यामुळे दोन्ही खोल्यांतील सर्व साहित्य, कपडे, कागदपत्रे, सोने, वासे, जळाऊ लाकडे आणि कौले पूर्णतः जळून गेली. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, शेवंती माईणकर ही ज्येष्ठ महिला बाहेरच्या खोलीत झोपलेली असताना अचानक घराच्या मागच्या बाजूने आवाज आल्याने तिने तात्काळ धाव घेतली असता स्वयंपाकघरात आग भडकलेली दिसून आली. त्यांनी मदतीसाठी घराबाहेर धाव घेतली आणि आपल्या मुलीला व इतरांना हाक मारून मदतीची विनंती केली.

अग्निशमन दलाचे वाहन घराजवळ पोहोचू शकत नसल्याने, जवळच्या कारखान्यातील कामगारांनी आणि मालकीणबाईने पाण्याच्या पाइपलाइनचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर वाळपई अग्निशमन दलाने तेथील रामदेव प्लास्टिक फॅक्टरीच्या पाइपलाइनला आपल्या यंत्रणेची जोडणी करून उर्वरित आग आटोक्यात आणली. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती आमदार डॉ. दिव्या राणे यांना मिळताच त्यांनी तत्काळ संपर्क साधून शेवंती माईणकर यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT