Borim Panchayat Gramsabha  Dainik Gomantak
गोवा

Borim News: भरमसाट घरपट्टीला 'बोरी'त लगाम! रक्कम निम्मी करण्याचा ठराव ग्रामसभेत संमत

Borim Panchayat: बोरी पंचायत क्षेत्रातील घरमालकांकडून भरमसाट घरपट्टी वसूल केली जाते. ही रक्कम सर्वसामान्यांना भरणे डोईजड होते, त्यामुळे ती निम्मी करावी, असा ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Borim Panchayat Gramsabha Meeting

बोरी: बोरी पंचायत क्षेत्रातील घरमालकांकडून भरमसाट घरपट्टी वसूल केली जाते. ही रक्कम सर्वसामान्यांना भरणे डोईजड होते, त्यामुळे ती निम्मी करावी, असा ठराव रविवारी झालेल्या ग्रामसभेत संमत करण्यात आला.

ही सभा सरपंच जयेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत सभागृहात झाली. यावेळी उपसरपंच रश्‍मी नाईक, पंच सागर नाईक बोरकर, सतीश नाईक, किरण नाईक, सुशील बोरकर, विनय बोरकर, संगीता गावडे, दत्तेश नाईक व जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर होते.

सरपंच नाईक यांनी स्वागत केले. सचिव प्रदीप नाईक यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला व त्याला मान्यता घेण्यात आली.

या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. ही ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच जयेश नाईक यांनी आभार मानले.

विविध विषयांवर चर्चा

१. यावेळी गावातून जाणाऱ्या हमरस्त्याची तसेच सर्व अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी असा ठराव घेण्यात आला.

२. रस्त्यांवर खोदकाम करून केबल तसेच पाइपलाइन घालण्याचे जे काम चालू आहे ते जलद गतीने करावे. तसेच खोदलेले चर दुरुस्त करून रस्ता वाहतूक सुरळीत केला जावा असे ठरवण्यात आले.

३. पंचायत क्षेत्रातील कचरा एकत्रित केला जातो, त्यासाठी कोमूनिदादकडून भूखंड घेऊन कचरा ठेवण्यासाठी शेड बांधण्याचे ठरविले. पूर्वी जी जागा बघितली होती ती जागा उपलब्ध करून घेण्यासाठी कोमूनिदादच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून हा प्रश्‍न लवकरात लवकर सोडविण्याचे ठरले.

४. तसेच सार्वजनिक आरोग्य, वीज, पाणी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्‍नांना सरपंच जयेश नाईक यांनी समर्पक उत्तरे दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT