Fake Parcel Scam: फेक पार्सल स्कॅमचा पर्दाफाश! ओडिशातील एकाला अटक; संशयिताच्या फोनतपासणीत धक्कादायक बाबी समोर
पणजी: बनावट पार्सल डिलिव्हरीच्या नावाखाली हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा छडा लावण्यात गोवा गुन्हे शाखेला यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ओडिशातून सुसांता भुये (३८, ओडिशा) या संशयिताला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोवा वेल्हा येथील एका तक्रारदाराला ‘डीटीडीसी’ पार्सलची पुन्हा डिलिव्हरी करण्यासाठी ८५,२३८.४७ रुपयांचे शुल्क भरण्याचा बनावट संदेश आला होता.
या फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तक्रारदाराची फसवणूक झाली. याप्रकरणी २७ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. पोलिस निरीक्षक महेश यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे ओडिशात छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले.
संशयिताला ३ जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ८ जानेवारी रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. हा तपास पोलिस उपअधीक्षक राजेश कुमार आणि गुन्हे शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
‘बल्क एसएमएस’चा वापर
संशयिताच्या फोनच्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हा आरोपी ‘बल्क एसएमएस’ सुविधेचा वापर करून देशभरातील नागरिकांना फिशिंग लिंक्स पाठवत असे. त्याच्या फोनमध्ये हनी ट्रॅपिंग, क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स, गेमिंग प्लॅटफॉर्म आणि पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली फसवणूक करण्याचे अनेक संदेश सापडले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

