Amit Shah  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: हो! म्हादईचे पाणी वळवून भाजप सरकारने कर्नाटकच्या शेतकऱ्यांना न्याय दिला : गृहमंत्री अमित शहा

बेळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत अमित शहांचे वक्तव्य

Rajat Sawant

Mahadayi Water Dispute: केंद्रातील भाजपने गोवा आणि कर्नाटकमधील म्हादईचा दीर्घकाळचा वाद मिटवला आहे. कर्नाटकमधील शेतकऱ्यांची तहान भागवण्यासाठी म्हादईचे पाणी कर्नाटकाला वळवण्यास केंद्रातील भाजपने मान्यता दिली आहे.

म्हादई प्रश्न सोडवण्यासाठी गोवा सरकारला सोबत घेतल्याबद्दल मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे आणि भाजप नेत्यांचे अभिनंदन करतो असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. आज बेळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत अमित शहांनी हे वक्तव्य केले.

शहांनी यावेळी कॉंग्रेसवर टिका केली. यावेळी त्यांनी गोव्यात 2007 साली सोनिया गांधी यांनी केलेल्या भाषणाचा दाखला दिला. ते म्हणाले, "म्हादईचे पाणी कर्नाटकच्या दिशेने वळवण्याची परवानगी देणार नाही असे सोनिया गांधींनी सांगितले होते. कर्नाटकला म्हादईच्या पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही याची काळजी काँग्रेस पक्ष घेईल असे 2022 मध्ये कॉंग्रेसने आपल्या घोषणापत्रात म्हटले होते."

"भाजपने अनेक कामे केली आहेत. भाजपने दोन्ही राज्यांमधील दीर्घकाळचा म्हादईचा वाद मिटवला आहे. म्हादईचे पाणी कर्नाटकला देवून येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवण्याचे काम केले आहे" असे यावेळी अमित शहा यांनी सांगितले.

दरम्यान आता यावरुन आता विरोधकांनी सरकारवर निषाणा साधला आहे. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी या प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री म्हादई प्रश्नी खोटे बोलत होते हे उघड झाले आहे. ही शेतकऱ्यांची तहान नाही, तर भाजपची सत्तेची भूक आहे. भाजपनेच जीवनदायिनी म्हादईचा खून केला अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला जोरदार धडक, 4 मुलांसह 6 जण गंभीर जखमी

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

SCROLL FOR NEXT