Dinesh Gaude Death Case Dainik Gomantak
गोवा

Dinesh Gaude Death Case: होमगार्ड दिनेश गावडेंचा मृत्यू गव्‍याच्या हल्ल्यातच, पोलिसांचा मोठा खुलासा; वन खात्‍याचे अनेक प्रश्‍‍न अनुत्तरितच

Bison Attack Death Betoda Goa: होमगार्ड दिनेश गावडे यांचा मृत्‍यू शिंगाच्‍या जखमेमुळे झाल्‍याचे शवविच्‍छेदन अहवालातून समोर आलेले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: होमगार्ड दिनेश गावडे यांचा मृत्‍यू शिंगाच्‍या जखमेमुळे झाल्‍याचे शवविच्‍छेदन अहवालातून समोर आलेले आहे. सोबतच प्रत्‍यक्षदर्शीने त्‍यांचा मृत्‍यू गव्‍याच्‍या हल्ल्‍यात झाल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यामुळे पोलिसांनी प्राथमिक तपासात गावडे यांचा मृत्‍यू गव्‍याच्‍या हल्ल्‍यात झाल्‍याचा निष्‍कर्ष काढलेला आहे, असे दक्षिण गोव्‍याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी स्‍पष्‍ट केले.

देसाई यांच्‍या या स्‍पष्‍टीकरणानंतरही वन खात्‍याचे अनेक प्रश्‍‍न अनुत्तरितच राहिले आहेत. उसगाव येथील होमगार्ड दिनेश गावडे यांचा काहीच दिवसांपूर्वी बेतोडा येथे मृत्‍यू झाला. त्‍यानंतर शवविच्‍छेदन अहवालातून शिंगामुळे गुदद्वारात जखमेने गावडे यांचा मृत्‍यू झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते, परंतु वन खात्‍याने मात्र याबाबत संशय व्‍यक्त करीत गावडे यांच्‍या मृत्‍यूची सखोल चौकशी करण्‍याची मागणी करणारे पत्र दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना पाठवले.

वन खात्‍याचे हे पत्र आणि शवविच्‍छेदन अहवाल सोशल मीडियावरून प्रसारित झाल्‍याने दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळाच्‍या मेडिसीन विभागाचे साहाय्‍यक प्राध्‍यापक डॉ. मधू घोडकिरेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गोपनीय अहवाल सार्वजनिक झालाच कसा? असा प्रश्‍‍न उपस्‍थित करीत त्‍यांनी वन खात्‍यावर ताशेरे ओढणारे प्रसिद्धी पत्रक जारी केले. शिवाय, वन खात्‍याचे सर्व दावे फेटाळून लावलेले होते.

दरम्‍यान, वन खात्‍याच्‍या पत्रानुसार पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना ‘‘शवविच्‍छेदन अहवालात गावडे यांचा मृत्‍यू शिंगासारखी टोकदार वस्‍तू शरीरात घुसल्‍याने झाला असावा असे म्‍हटले आहे. शिवाय प्रत्‍यक्षदर्शीनेही हा मृत्‍यू गव्‍याच्‍या हल्‍ल्‍यात झाल्‍याचा जबाब नोंदवलेला आहे. त्‍यामुळे हा मृत्‍यू गव्‍याच्‍या हल्‍ल्‍यामुळेच झाला असावा, अशा प्राथमिक निष्‍कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. आणखी काही पुरावे सापडल्‍यास मृत्‍यूची वेगळी कारणे पुढे येऊ शकतात’’, असे संतोष देसाई यांनी स्‍पष्‍ट केले.

आज संयुक्त पाहणी

दिनेश गावडे यांचा मृत्‍यू गव्‍याच्‍या हल्‍ल्‍यामुळे झाला की या मृत्‍यूमागे अन्‍य कोणते कारण आहे? याचा सोक्षमोक्ष लावण्‍यासाठी ज्‍या ठिकाणी हा मृत्‍यू झाला त्‍या बेतोडा परिसरात बुधवारी वन खात्‍याचे अधिकारी आणि पोलिसांकडून संयुक्त पाहणी केली जाणार आहे. संयुक्त पाहणीतून अनेक गोष्‍टींचा उलगडा होण्‍यास मदत होणार आहे.

सरकारकडून प्रकरण झाकण्‍याचा प्रयत्‍न : फर्नांडिस

दिनेश गावडे यांचा मृत्‍यू गव्याच्या हल्ल्याने झाला की यामागे दुसरे कारण आहे? असे प्रश्न वन खात्याने पोलिसांना पाठविलेल्या पत्रामुळे निर्माण झाले आहेत. गावडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येणे गरजेचे आहे. सरकारकडून हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण लोकांना सर्व काही माहीत आहे’’, असे खासदार विरियातो फर्नांडिस मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्‍हणाले.

...म्‍हणूनच केली होती चौकशीची मागणी : वार्के

दिनेश गावडे यांचा मृत्‍यू गव्‍याच्‍या हल्ल्‍यात झाल्‍याचा संशय निर्माण झाल्‍याने वन खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची पाहणी केली, परंतु त्‍यात त्‍यांचा मृत्‍यू गव्‍याच्‍या हल्ल्‍यात झाल्‍याचे समोर आलेले नव्‍हते. त्‍यामुळेच या प्रकरणाची चौकशी करण्‍याची मागणी खात्‍याने दक्षिण गोवा पोलिस (Police) अधीक्षकांकडे केलेली होती, असे उपवनसंरक्षक जीस वार्के यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

Goa Eco-Friendly Ganesha: मूर्तीकारांसाठी सावंत सरकारची मोठी घोषणा! आता प्रत्येक मातीच्या मूर्तीवर मिळणार 'इतके' अनुदान; पर्यावरण संरक्षणाचा नवा पॅटर्न

Goa Shack Policy 2026: गोव्यात सुधारित 'शॅक धोरण' लागू! समुद्रकिनाऱ्यावर डेक-बेड्स, छत्र्या ठेवण्यासाठी पर्यटन खात्याने मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT