Michael Douglas plans trip to South India Dainik Gomantak
गोवा

Hollywood Actor Goa Visit: हैदराबाद ते गोवा; हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला फिरायचा आहे साऊथ इंडिया

अभिनेते मायकल डग्लस यांनी प्रसिद्ध 'बेसिक इंस्टिंक्ट' चित्रपटात काम केले आहे.

Pramod Yadav

Michael Douglas plans trip to South India: गोव्याला देश विदेशातील पर्यटक भेट देत असतात. प्रसिद्ध बॉलिवूड - हॉलिवूड अभिनेते, अभिनेत्री तसेच, अनेक प्रसिद्ध लोक गोवा फिरण्यासाठी येत असतात. नुकतेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये गोव्यात होणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सवाच्या (2023) पोस्टरचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी विविध कलाकारांनी भारतीय पॅव्हेलियनला भेट दिली.

(From Hyderabad to Goa, Michael Douglas plans trip to South India)

नुकतेच झालेल्या 2023 कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये, ज्येष्ठ अभिनेते हॉलिवूड अभिनेते मायकल डग्लस यांनी भारतीय पॅव्हेलियनला भेट दिली. यावेळी मायकल यांनी अद्याप दक्षिण भारत फिरला नसल्याचे सांगितले, तसेच नजीकच्या काळात त्यांना हैदराबाद ते गोवा असा दक्षिण भारत फिरायची असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

अभिनेते मायकल डग्लस यांनी प्रसिद्ध 'बेसिक इंस्टिंक्ट' चित्रपटात काम केले आहे. डग्लस यांनी कान्समध्ये भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्री एल मुरुगन यांच्यासमवेत भारतीय पॅव्हेलियनला भेट दिली. मुरुगन यांनी या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोव्यात होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) साठी डग्लस यांना आमंत्रित केले आहे.

दरम्यान, यापूर्वी तीन वेळा भारतात आल्याची माहिती डग्लस यांनी दिली. भारताने नेहमीच मला खूप प्रभावित केले असून, येथील लोकांची ऊर्जा, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेने खूप प्रभावित झाल्याचे डग्लस म्हणाले.

माझी पत्नी कॅथरीन झेटा-जोन्सचे भारतावर विशेष प्रेम आहे आणि ती एक उत्तम बॉलीवूड नृत्यांगना देखील आहे. गेल्या वर्षी, अभिनेता डग्लस आणि त्यांची पत्नी कॅथरीन झेटा-जोन्स 'अनप्लग्ड इन मुंबई' या फीचर फिल्ममध्ये काम केले होते. यात दोघेही मुंबई एक्सप्लोर करताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मीन राशीला शनीचा दणका! 40 दिवस 'अस्त', 138 दिवस 'वक्री' राहून कोणत्या राशींचे उघडले भाग्याचे दरवाजे?

गोव्यात निवडणुकीच्या तयारीला वेग! 91 टक्क्यांहून अधिक मतदारांची गणना पूर्ण; सीईओ संजय गोयल यांचा खुलासा

'शार्क टँक'ची Namita Thapar गोव्यात! ''12 तासांच्या शूटिंगमधून सुटका'' म्हणत शेअर केले फोटोज; व्हेकेशन लूक होतोय Viral

Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

SCROLL FOR NEXT