Goa Collapsed Hoarding Dainik Gomantak
गोवा

Goa News: जाहिरात फलक कोसळल्‍याने शेतीची नासाडी

Goa Hoardings: वर्षाकाठी महसूल मिळत असल्‍याने ग्रामपंचायतीचेही दुर्लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

धारगळ पंचायत क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग ६६ महाखाजन येथील शेतात मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले होते. जोरदार वाऱ्या-पावसामुळे ते सध्‍या जमीनदोस्त झाले आहेत. त्‍यामुळे शेतीची नासाडी झाली आहे.

या जाहिरात फलकांमुळे धारगळ पंचायतीला वर्षाला महसूल मिळतो. फलकामागे किमान ३० ते ३५ हजार रुपये वर्षाला पंचायतीला मिळतात.

राष्ट्रीय महामार्ग ६६ महाखाजन-धारगळ येथे मोठ्या प्रमाणात भातशेती आहे. या शेताच्या मधूनच राष्ट्रीय महामार्ग जातो. शेतकरी दरवर्षी भातशेतीबरोबरच उन्हाळ्यात भुईमूग, मिरच्या, हळसांदे व पालेभाज्यांचे उत्‍पादन घेऊन आपला उदरनिर्वाह करतात.

परंतु या शेतकऱ्यांवर त्‍यांच्‍या जमिनीत जाहिरात फलक लावण्‍यासाठी काही पंचसदस्‍य दबाव आणतात, कारण त्‍या-त्‍या कंपन्‍यांकडून ‘अर्थपूर्ण’ सौदा झालेला असतो. शिवाय पंचायतीलाही महसूल मिळतो. स्‍वत:च्‍या स्‍वार्थासाठी काही पंच शेतकऱ्यांचा बळी देत आहेत, असा आरोप आता होऊ लागला आहे.

शेतजमीन पडीक; लाखोंचा व्‍यवहार

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तेथे येणारे प्रकल्पांबाबत मोठमोठ्या जाहिराती या फलकांवर दिसून येतात. त्यामुळे त्या-त्‍या कंपनीकडून काही दलाल परस्पर लाखो रुपये वसूल करतात. पंचायतीला मात्र अल्प महसूल मिळवून दिला जातो. शेतीची नुकसानी झाली तरी त्‍या कंपन्‍यांना किंवा दलालांना किंवा पंचांना काहीच पडलेले नाही. या राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना, वाहनचालकांना जाहिरात फलक ठळकपणे दिसावेत, हाच त्‍यांचा हेतू असतो. विशेष म्‍हणजे हे फलक लावण्‍यासाठी शेतजमीन पडीक ठेवण्‍याचे प्रकारही वाढले आहेत.

अर्जुन कानोळकर, सरपंच

प्रत्‍येक जाहिरात फलकामुळे ग्रामपंचायतीला वर्षाकाठी महसूल मिळतो. जे दोन भलेमोठे फलक पडलेले आहेत, त्यामुळे शेतीची नुकसानी झालेली आहे. नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना कंपनीने योग्य तो मोबदला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT