CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

मुक्तिलढ्याचा इतिहास अभ्‍यासक्रमात समाविष्‍ट करणार; मुख्‍यमंत्री सावंत

डिजिटल क्रांतीची गरज

दैनिक गोमन्तक

पणजी: शिक्षण क्षेत्रासह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात डिजिटल क्रांतीची गरज आहे. सरकारने राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू केली असून विद्यार्थ्यांमध्‍ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार व्‍हावा यासाठी राज्‍यभरातील शाळांमध्‍ये कोडिंग आणि रोबोटिक्‍स सुरू केले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून एनसीईआरटी अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात येईल आणि त्‍यात गोव्‍याचा स्‍वातंत्र्यलढ्याचा समावेश केला जाईल, असे मत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्‍यक्त केले.

(history of the liberation struggle will be included in the curriculum; Chief Minister Sawant)

पणजीच्‍या आझाद मैदानावर 76 व्‍या क्रांतिदिनानिमित्त शहिदांना राज्‍यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्‍या हस्‍ते पुष्‍पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्‍यात आली. यावेळ मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाजकल्‍याणमंत्री सुभाष फळदेसाई, स्‍वातंत्र्यसैनिक व अधिकारी यांनीही आदरांजली वाहिली. यावेळी गोवा पोलिस दलाच्‍या वतीने शहिदांना मानवंदना देण्‍यात आली. मुख्‍यमंत्री म्‍हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवून आणण्‍यासाठी राज्‍य सरकारचे प्रयत्‍न सुरू आहेत. राज्‍यपाल पिल्लई यांनी मुक्तिलढ्याच्‍या इतिहासाचे स्‍मरण करत राम मनोहर लोहिया यांच्‍या मौलिक योगदानाचा उल्लेख केला.

स्‍वातंत्र्यसैनिकांची नोंद घेणार

देशाच्‍या स्‍वातंत्र्यलढ्याबरोबर गोवा मुक्तीच्‍या लढ्यात सहभागी झालेल्‍या पण सरकार दरबारी नोंद न झालेल्‍या स्‍वातंत्र्यसैनिकांच्‍या योगदानाची दखल घेऊन त्‍यांची नोंद करण्‍याची सूचना गृह विभागाला देण्‍यात आली असल्‍याची माहिती मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्‍यामुळे अज्ञात स्‍वातंत्र्यसैनिक आता सरकार दरबारी नोंद होतील.

मुलांना आग्‍वाद स्‍वातंत्र्यस्‍मारक दाखवा

गोवा मुक्तिलढ्यात आग्‍वाद कारागृहाचे योगदान मोठे आहे. राज्‍य सरकारने हा कारागृह आता स्‍वातंत्र्यस्‍मारक म्‍हणून विकसित केले आहे. यात संपूर्ण स्‍वातंत्र्यलढ्याचा इतिहास मांडण्‍याचा प्रयत्‍न केला असून येथे संग्रहालयही आहे. यामुळे शिक्षकांनी मुलांना सोबत घेऊन गोवा मुक्तीचे हे स्‍मारक दाखवलेच पाहिजे, ज्‍यामुळे विद्यार्थ्यांना राष्‍ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल, असे मुख्‍यमंत्री सावंत म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT