पणजी: तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकबाकीमुळे अडचणीत सापडलेल्या पणजीतील ऐतिहासिक मांडवी हॉटेलची मालमत्ता बँक ताब्यात घेणार आहे. कर्ज चुकते करण्यास असमर्थ ठरल्याने बँकेने जप्तीची नोटीस हॉटेलला बजावली आहे. पोर्तुगीज काळात बांधण्यात आलेले मांडवी हॉटेल वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
मांडवी हॉटेलच्या मालकांनी गोवा अर्बन बँकेकडून कर्ज काढले होते. हॉटेल मालक कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने बँकेने हॉटेल मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे हॉटेल बंद स्थितीत आहे. हॉटेल ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज करुन त्यांच्या देखरेखीखाली मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे.
पोर्तुगीज काळात म्हणजेज १९५० साली मांडवी हॉटलेच्या बांधकामाला सुरुवात झाली. १९५२ साली हे हॉटेल बांधून पूर्ण झाले. या हॉटेलमध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक राजकीय नेते कलाकार व प्रसिद्ध व्यक्तींनी मुक्काम केला आहे. राजधानी पणजीतून जाणाऱ्या मुख्य मार्गालगत असलेले हे हॉटेल अनेकांसाठी आकर्षणाचे स्थळ देखील आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मांडवी हॉटेलमध्ये २०१० पर्यंत राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील बैठका आणि परिषदा देखील पार पडत होत्या. मांडवी हॉटेलपासून जवळच पोलिस मुख्यालय, मुख्यमंत्री निवास्थान, राजभवन, विधानसभा तसेच पणजी बसस्थानक अशी ठिकाणी काही अंतरावर असल्याने हे हॉटेल मोक्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.