Hindu Janjagruti Samiti to Discuss Making of film on Goa Files Dainik Gomantak
गोवा

कश्मीर, केरळ नंतर आता 'गोवा फाइल्स'? हिंदू जनजागृती समिती अधिवेशनात करणार चर्चा

गोव्यात पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझीशन’च्या नावाखाली जनतेवर केलेले अमानवी अत्याचार संपूर्ण देशाला कळणे आवश्यक - हिंदू जनजागृती समिती

Pramod Yadav

Hindu Janjagruti Samiti to Discuss on Making film on Goa Files: 'द कश्मीर फाइल्स' आणि 'द केरळ स्टोरी' या चित्रपटांवरून मोठा वादंग झाल्यानंतर आता 'गोवा फाइल्स' चित्रपट बनविण्याबाबत हिंदू जनजागृती समिती चर्चा करणार आहे. गोव्यात पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझीशन’च्या नावाखाली जनतेवर केलेले अमानवी अत्याचार संपूर्ण देशाला कळणे आवश्यक आहे. असे हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे.

यंदा 16 ते 22 जून 2023 या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. याबाबत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटांच्या माध्यामातून काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेले अत्याचार आणि 'द केरळ स्टोरी' चित्रपटातून 'लव्ह जिहाद'बाबत माहिती समोर आली. त्याचप्रमाणे गोव्याचा काळा इतिहास अधिक काळ जनतेपासून लपवून ठेवता येणार नाही. असे शिंदे यांनी म्हटले आहे. याबाबत आगामी अधिवेशात चर्चा होणार असून, चित्रपटविश्वातील लोक या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. यावेळी गोव्यातील कोणत्या विषयांवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकता येईल याबाबत चर्चा होणार आहे.' असे रमेश शिंदे यांनी 'गोमन्तक'शी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवराज्याभिषेक कार्यक्रमावेळी राज्यातील "पोर्तुगीजांच्या खुणा पुसून टाकण्याची वेळ आली आहे" असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आठवडाभराने हिंदू जनजागृती समितीने याबाबत वक्तव्य केले आहे. 350 वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी मंदिरे उद्धवस्त करण्यास सुरूवात केली पण छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे त्यांचा विध्वंस थांबला असेही सावंत यावेळी बोलताना म्हणाले होते.

दरम्यान, ‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवा’ला अमेरिका, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, सिंगापूर, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांसह भारतातील 28 राज्यांतील 350 हून अधिक हिंदू संघटनांच्या 1500 हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

Viral Video: नवी कोरी थार काही दिवसांत बंद पडली; मालकाने गाढवं बांधून, ताशा वाजवत कार शोरुमला ओढत नेली, व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT