Hill Top Goa  Dainik Gomantak/
गोवा

Hill Top Goa : हणजूण हिलटॉप ते शापोरा किल्ला परिसर ‘सोलर’ दिव्‍यांनी प्रकाशमान

Hill Top Goa : हणजूण-कायसूव पंचायत मंडळाच्या सहकार्याने स्थानिक पंचायत क्षेत्रातील अनेक कामांना वेग देण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Hill Top Goa : कळंगुट शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो व हणजूण-कायसूव पंचायत मंडळ यांच्‍या सहकार्याने हणजूण हिलटॉप परिसर ते शापोरा किल्ला यादरम्‍यानचा परिसर सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांनी प्रकाशमान करण्यात आला आहे.

या भागात दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या इनफिल्ड बुलेट कंपनीच्या सहयोगाने त्यांनी पुरस्‍कृत केलेल्या सीएसआर फंडामुळे या भागात हे दिवे बसविणे शक्य झाल्याचे आमदार लोबो यांनी सांगितले. हणजूण-कायसूव पंचायत मंडळाच्या सहकार्याने स्थानिक पंचायत क्षेत्रातील अनेक कामांना वेग देण्यात येणार आहे.

त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे लोबो यांनी सांगितले. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी अशा प्रकारची सोय संपूर्ण मतदारसंघात करण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी बोलून दाखविला. यावेळी हणजूण कायसूव पंचायत मंडळाच्‍या प्रतिमा गोवेकर, सुदेश पार्सेकर, दिनेश पाटील, सुरेंद्र गोवेकर, निकिता गोवेकर, माजी सरपंच ॲड. सुहासिनी गोवेकर, पंचसदस्य तसेच स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Injury Update: श्रेयस अय्यरच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट, 'बीसीसीआय'ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Goa Murder Case: पीर्ण येथील हत्येचं गूढ 15 तासांत उलगडलं, मुख्य आरोपीला अटक; साथीदारांचा शोध सुरू

Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

Venkateswara Temple Stampede: आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू Video

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

SCROLL FOR NEXT