High Powered committee Meeting Dainik Gomantak
गोवा

Sonsodo Project : सोनसोडोवर बायोमिथेनेशन प्रकल्प : मुख्यमंत्री सावंत

एचपीसीच्‍या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगावातील सोनसोडो कचरा व्यवस्थापन समस्या सोडविण्यासाठी पहिल्या टप्प्यात येत्या वर्षभरात प्रतिदिन 15 मेट्रिक टन बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सुमारे दोन वर्षांच्या कालावधीनंतर सोनसोडो घनकचरा व्यवस्थापनावरील उच्चाधिकार समितीची (एचपीसी) बैठक मुख्यमंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. त्‍यात ते बोलत होते. यावेळी नगरनियोजनमंत्री विश्‍‍वजीत राणे, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स उपस्थित होते.

मडगाव आणि परिसरात दररोज सरासरी ५० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी ३५ टन ओला कचरा आणि १५ टन सुका कचरा असतो. मडगाव नगरपालिका १५ टन कचरा प्रकल्पासाठी निधी आणि देखरेख करेल. तांत्रिक साहाय्य गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रकल्पाच्या अंमलबजावणीची पाहणी करेल, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

पालिका पैसे गोळा करून गोवा राज्य कचरा व्यवस्थापन मंडळाकडे जमा करेल आणि मंडळाद्वारे निविदा जारी केली जाईल, असेही मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले.

"सोनसोडोची कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यासाठी कायमस्वरूपी आणि शाश्वत कचरा प्रकल्पाची नितांत गरज आहे. हा प्रकल्प उभारावा यासाठी प्रयत्नशील असून वर्षभरात या त्‍यावर विशेष काम केले जाईल."

डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT