High Court of Bombay at Goa | Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना दिलासा; गोवा खंडपीठाकडून समन्स रद्द

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी केजरीवाल यांना समन्स जारी करण्यात आले होते.

Pramod Yadav

Arvind Kejriwal: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मंगळवारी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध म्हापसा न्यायालयाने रद्द केलेले समन्स रद्द केले.

पक्षाचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी केजरीवाल यांना समन्स जारी करण्यात आले होते.

2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या संदर्भात म्हापसा न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे जारी केलेले समन्स रद्द केले आहेत, अशी माहिती अमित पालेकर यांनी दिली.

न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, म्हापसा न्यायालयाने केजरीवाल यांना लोकप्रतिनिधी कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 171 (ई) अंतर्गत दाखल केलेल्या आरोपपत्रासंदर्भात समन्स बजावले होते.

केजरीवाल यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेएमएफसीने समन्स बजावले होते. समन्सला उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ मागितला होता, असे पालेकर म्हणाले.

दरम्यान, गोवा खंडपीठाने हे समन्स रद्द करुन प्रकरण पुनर्विचारासाठी म्हापसा न्यायालयाकडे पाठवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT