High Court Of Bombay At Goa Dainik Gomantak
गोवा

High Court Of Bombay At Goa: हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गोवा पोलिस अलर्ट मोडवर

High Court of Bombay at Goa: दक्षिण गोव्यातील काणकोण बसस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर आता पर्वरीतील हायकोर्टाची इमारत उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

Pramod Yadav

पर्वरी: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाची इमारत बॉम्बने उडवून देण्याबाबत धमकीचा ई-मेल कोर्टाला मिळाला आहे. आयईडीने कोर्टाची इमारत उडवून देण्याची धमकी ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. पर्वरी पोलिस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास केला जात आहे.

हायकोर्टाच्या इमारतीला आयईडी बॉम्बने उडवून देऊ, असा अनोळखी व्यक्तीचा ई-मेल मिळाला असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पर्वरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

तसेच, बॉम्ब निकामी करणारे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पणजीतील पोलिस मुख्यालय देखील बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देणारा एक ई-मेल प्राप्त झाला होता. चौकशीअंती हा ई-मेल फेक असल्याचे उघडकीस आले होते.

काणकोण कदंब स्थानकावर बॉम्बची अफवा; उडाला गोंधळ

काणकोण येथील कदंब बसस्थानकावरील वाहतूक निरिक्षकाच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन कॉल आल्याने सोमवारी (२१ एप्रिल) गोंधळ उडाला. लगेच बॉम्ब शोध पथकाला घटनास्थळी पाचारण केले, मात्र येथे काहीही संशयास्पद सापडले नाही, असे पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांनी सांगितले.

मात्र ही घटना घडल्यानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून बसस्थानकावरील सर्व बसेस मडगाव कारवार हमरस्त्यावर हलविण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT