GMC Goa Dainik Gomantak
गोवा

गोमेकॉ नोकरभरतीप्रकरणी सरकारला नोटीस

गैरप्रकाराविरोधात आव्हान याचिकेवरील पुढील सुनावणी 24 जानेवारीला

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात विविध पदांवरील नोकरभरतीत झालेल्या गैरप्रकाराविरोधात शैलेंद्र वेलिंगकर यांनी सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर आली. प्राथमिक सुनावणीनंतर गोवा खंडपीठाने सरकारला नोटीस बजावून त्यावरील सुनावणी 24 जानेवारीला ठेवली आहे. तसेच वेलिंगकर यांची ही याचिका इतर नोकरभरती घोटाळा याचिकांसोबत जोडण्यात यावी, असेही नमूद केले आहे. (GMC Goa News Updates)

आरोग्‍य खाते तसेच गोमेकॉत (GMC) विविध पदांसाठी नोकरभरती करण्यात आली आहे. ही नोकरभरती सर्व नियम व प्रक्रिया धाब्यावर बसवून करण्‍यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी घोषित होण्यापूर्वीच काहींना त्यांची नियुक्तीपत्रे पोचवण्यात आली. बहुतांश निवड झालेले उमेदवार हे सत्तरी (Sattari) तालुक्यातीलच आहेत.

राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणून घाईघाईने उमेदवारांची निवड केली गेली. मल्टी-टास्क सेवेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना आचारसंहिता लागू झाल्यानंतरही मागील तारखेने नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यामुळे या नोकरभरतीत गैरप्रकार (Fraud) झाला असून गोवा खंडपीठाने या संपूर्ण प्रक्रियेच्‍या चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकादार वेलिंगकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT