Margao Municipal Council Gomantak Digital Team
गोवा

Margao Municipal Council: कोलमोरोड रस्‍त्‍याचे डांबरीकरण करा; न्‍यायालयाचा आदेश

मडगाव पालिकेकडून तातडीने पाहणी

Kavya Powar

Margao Municipal Council: कोलमोरोड मडगाव येथील रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने निकालात काढून मडगाव पालिकेला दोन महिन्यांत डांबरीकरण करण्याचा आदेश दिला आहे.

त्यामुळे मडगावचे आमदार दिगंबर कामत, पालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर, पालिका अभियंता दीपक देसाई, कनिष्ठ अभियंता राजेश देसाई, साहाय्यक अभियंता श्रीकांत लवंदे व तांत्रिक विभागाच्या इतरांनी काल सायंकाळी तातडीने या जागेची पाहणी केली.

पालिकेद्वारे जमा करण्यात आलेले सुमारे २.७३ कोटी रुपये फक्त पालिका काढू शकते. मात्र, डांबरीकरण केल्यानंतर दोन बिंदू ‘डी’ आणि ‘ई''पर्यंत डांबरीकरण केल्याचा अनुपालन अहवाल छायाचित्रांसह या न्यायालयात द्यावा. हा अनुपालन अहवाल दाखल केल्यानंतर ही रक्कम काढता येईल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.

रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण होणार

न्यायालयाने दोन महिन्यांची वेळ दिली असून त्या मुदतीत या रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल, अशी माहिती मुख्‍याधिकारी शंखवाळकर यांनी दिली. रस्‍त्‍याचे डांबरीकरण करण्‍याचे निर्देश देऊन रस्‍त्‍याच्‍या प्रश्नासंदर्भातील अवमान याचिका उच्‍च न्‍यायालयाने बुधवारी निकालात काढल्‍याने मडगाव नगरपालिकेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दोन महिन्यांत रस्त्याच्या दोन्ही टोकांपर्यंत डांबरीकरण करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT