हजार कोटी खर्चून वीज सुविधांत घडवून आणणार आमूलाग्र बदल; वीजमंत्री ढवळीकर

मडगावात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरू
Electricity Facilities in Goa
Electricity Facilities in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Electricity Facilities in Goa: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी १९६५ पर्यंत गोव्यातील कानाकोपऱ्यात वीज पोचवली. त्यानंतरच्या वीजमंत्र्यांनी काहीही बदल केला नाही. आपण वीजमंत्री झाल्यावर गोव्यातील वीज साधनसुविधा वाढविण्यावर, वीजपुरवठा सुरळीत करण्यावर जोर दिला आहे.

पुढील काही वर्षांत एक हजार कोटी रुपये खर्चून वीज क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल केले जातील, अशी घोषणा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज मडगावात केली.

Electricity Facilities in Goa
37th National Games: राष्ट्रीय स्पर्धेतील खेळ घटणार; तीन खेळांवर टांगती तलवार

कुंकळ्ळी वीज उपकेंद्र ते फातोर्डा वीज उपकेंद्रापर्यंत २२०/३३ केव्ही ३ सी/४०० चौ. मी. डबल सर्कीट भूमिगत वीजवाहिन्या घालण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स उपस्थित होते.

आपण वीजमंत्री झाल्यावर अनेक प्रकल्प सुरू करून ते पूर्ण करून दाखवले. कुडतरीत १५ नवे ट्रान्स्फॉर्मर बसविले जातील. त्यासाठी २.९३ कोटी रुपये खर्च येणार आहे. फातोर्ड्यात ५ नवे, तर ५ ट्रान्स्फॉर्मरची क्षमता वाढवली जाईल. त्यासाठी १.७३ कोटी रुपये खर्च येणार आहे, असेही ढवळीकर म्हणाले.

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी लोक केवळ निरर्थक टीका करतात. वीज अधिकारी, अभियंते, कर्मचारी धोका पत्करून काम करतात, त्यांना शाबासकी दिली पाहिजे. कुडतरी मतदारसंघात विकासकामांना सुरवात झाली आहे. मात्र, अजून भूमिगत वीजवाहिन्यांचे काम झाले नसल्याचे वीजमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

अनेक ठिकाणी नवी वीज उपकेंद्रे

भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुमारे २९.५ कि.मी.चे आहे. यासाठी जवळ जवळ ४१ कोटी रुपये खर्च येणार आहे. पूर्वीचे सर्व कंडक्टर्स बदलण्यात आले आहेत, काही ठिकाणी ते बदलले जातील.

ट्रान्स्फॉर्मर नवे बसविले जातील व काही ट्रान्स्फॉर्मरची क्षमता वाढविली जाईल. फातोर्डा व मडगावमधील वीज उपकेंद्राचे दुरुस्ती काम हाती घेतली जाईल, शिवाय वेर्णा येथे ३५० कोटी रुपये खर्चून नवे वीज उपकेंद्र बांधले जाईल व पुढील १५ दिवसांत त्याचा पायाभरणी समारंभ होणार असल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली.

‘फातोर्ड्यातील वीज समस्या सुटणार’

याप्रसंगी आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले, की भूमिगत मलनिस्सारण वाहिनी व वीज वाहिनीचे १०० टक्के काम पूर्ण झालेला फातोर्डा हा एकमेव मतदारसंघ आहे. सध्या वीजेसंदर्भातील साधनसुविधा महाग झालेली आहे. फातोर्ड्यात गेली दहा वर्षे विजेची समस्या आहे, परंतु कुंकळ्ळीहून वीजपुरवठा होणार असल्याने ती समस्या आता दूर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com