Hemant Angle Dainik Gomantak
गोवा

Duleep Trophy 2023 : हेमंत आंगले दक्षिण विभागाचे मुख्य प्रशिक्षक

गोवा क्रिकेट असोसिएशनकडे महत्त्वाची जबाबदारी

किशोर पेटकर

यावेळच्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेत गोवा क्रिकेट असोसिएशनकडे (जीसीए) महत्त्वाची जबाबदारी आहे. स्पर्धेसाठी दक्षिण विभाग संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी रणजी अष्टपैलू, ज्येष्ठ मार्गदर्शक 64 वर्षीय हेमंत आंगले यांची नियुक्ती झाली असून जीसीएचेच उत्कर्ष शिरोडकर यांची व्यवस्थापक, तर जोशुआ तलवार यांची मसाजर म्हणून निवड झाली.

दुलीप करंडक स्पर्धा 28 जूनपासून खेळली जाईल. दक्षिण विभाग संघ गतउपविजेता असल्यामुळे बंगळूर येथे होणाऱ्या स्पर्धेत त्यांना थेट उपांत्य फेरीत चाल देण्यात आली आहे.

कसोटीपटू हनुमा विहारी संघाचा कर्णधार, तर मयांक अगरवाल उपकर्णधार आहे. दक्षिण विभागाचा उपांत्य सामना पाच जुलैपासून खेळला जाईल. त्यांच्यासमोर मध्य व पूर्व विभाग यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल.

दरम्यान, दक्षिण विभाग दुलीप करंडक संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी संधी दिल्याबद्दल हेमंत आंगले यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विपुल फडके, सचिव व दक्षिण विभाग निमंत्रक रोहन गावस देसाई, समिती पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.

गोव्यात निवड समिती बैठक

यंदा दक्षिण विभागाच्या निमंत्रकपदी जीसीए सचिव रोहन गावस देसाई आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता विभागीय पातळीवर जीसीएचे महत्त्व वाढले आहे. गोव्याचे माजी रणजीपटू धीरज नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या मंगळवारी दक्षिण विभाग निवड समितीची बैठक गोव्यात झाली.

त्यावेळी गोव्याचा रणजी संघ कर्णधार अष्टपैलू दर्शन मिसाळ याची १५ सदस्यीय संघात निवड झाली, तर सुयश प्रभुदेसाई याला राखीव खेळाडूंत स्थान मिळाले. मुख्य प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि मसाजर ही पदेही जीसीएकडे आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

Priyanka Chopra In Goa: उकडलेला भात, कॅरम आणि बीच वॉक; प्रियांकानं शेअर केले 'गोवा व्हेकेशन'चे PHOTO, पाहून तुम्हीही व्हाल 'Chill'

FDA Raids: एफडीएची धडक कारवाई! बागा, कळंगुट परिसरात 71 आस्थापनांची तपासणी, दंडात्मक कारवाईसह काजू युनिटला ठोकले टाळे

Viral Post: बंगळूरच्या तरुणाने दिला Cheat Code, गोव्यात टॅक्सी भाड्याचा दर कमी करणारं 'ते' एक वाक्य होतंय व्हायरल!

SCROLL FOR NEXT