A helping hand will give to the workers by ESIC 
गोवा

राज्य विमा महामंडळातर्फे कामगारांना दिला जाणार मदतीचा हात

गोमंतक वृत्तसेवा

पणजी : कोविड महामारीमुळे देशभरातील मार्च ते डिसेंबर या दरम्यानच्या काळात नोकरी गेलेल्या कामगारांना कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे (ईएसआयसी) तीन महिन्यांच्या सरासरी पगाराच्या ५० टक्के रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे. राज्यात अद्यापि अनेक कामगारांचे यासाठीचे अर्ज प्राप्त होत असून, डिसेंबरनंतर त्यांची छाननी होऊन ती रक्कम अदा केली जाण्याची शक्यता आहे. 


राज्यात सुमारे तीन ते साडेतीन लाख कर्मचारी ईएसआय बोर्डाकडे नोंदीत आहेत. त्यातील किती जणांची नोकरी गेली आहे, कितीजण त्या मदतीचे पात्र ठरणार आहेत, हे काम अजूनतरी येथील कार्यालयाकडून सुरू झालेले नाही. पुढील महिन्यानंतर (डिसेंबर) राज्यातील किती नोंदीत कामगारांच्या नोकरीवर गदा आली हे स्पष्ट होईल. अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत कामगारांना हा फायदा मिळवून दिला जाणार आहे. 


बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेतून काही प्रमाणात आर्थिक मदत व्हावी, जी कुटुंबे त्या कामगाराच्या पगारावर अवलंबून होती, त्यांना थोडाफार दिलासा मिळावा, अशी सरकारची अपेक्षा आहे. याशिवाय केंद्र सरकारने या योजनेला १ जानेवारी ते ३० जून २०२१ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२०पर्यंत आलेल्या अर्जांची छाननी झाल्यानंतर या टप्प्यातील लाभार्थ्यांना ती रक्कम पुढील वर्षी अदा केली जाण्याची शक्यता असल्याचे येथील कार्यालयातून सांगण्यात आले. परंतु, जर केंद्र सरकारने डिसेंबरमध्येही ही रक्कम वाटपास मंजुरी दिली तर त्याची कार्यवाही पुढील महिन्यापासून करावी लागेल, असे येथील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT