Sopo Tax Dainik Gomantak
गोवा

Sopo Tax: महानगरपालिका बैठकीत सोपो करावरून जोरदार गदारोळ

मडकईकर, फुर्तादो आणि लॉरेन भिडले

दैनिक गोमन्तक

Sopo Tax: विना पावती सोपो कर संकलन करण्याचा मुद्दा अपेक्षेनुसार महापालिका बैठकीत गाजला. नगरसेवक उदय मडकईकर आणि सुरेंद्र फुर्तादो यांनी सोपो कराच्या पावत्याच सभागृहात दाखविल्या. प्रत्येक पावतीमागील सहा रुपये कोणाच्या खिशात जातात? असा सवाल करीत पंधरा वर्षांच्या घोटाळ्यात कोणत्याही चौकशीला आम्ही तयार असल्याचे दोघांनीही आश्‍वासन दिले.

पे-पार्किंग कंत्राटदारास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आपण मांडलाच नाही, तरी आपले नाव नोटमध्ये का घातले? या विषयावरून मडकईकर यांनी आयुक्तांवर हल्लाबोल करीत कारवाई करण्याचा इशारा दिला.

महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सुरुवातीलाच फुर्तादो यांनी स्वीकृत नगरसेवक किशोर शास्त्री यांचा निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात वाढलेल्या हस्तक्षेपावर आक्षेप नोंदविला.

त्याशिवाय मार्केटमध्ये प्रभुदेवा याला ३००० चौ. मी.जागा कोणाच्या मंजुरीने दिली? असा सवाल केला. फुर्तादो यांचे विषय संपताच मडकईकर यांनी या बैठकीवर आक्षेप नोंदविला. महानगरपालिकेची बैठक किती महिन्यांनी घेतली जावी, असा सवाल त्यांनी आयुक्तांना केला. त्याशिवाय मार्केट परिसरात विना पावती सोपो कर संकलन करण्याचा जो प्रकार घडला आहे, त्याविषयी माहिती सादर केली.

रोजंदारीवर असलेले कर्मचारी आपणास उलट उत्तर देत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी मार्केट समिती अध्यक्ष बेंटो लॉरेन व मडकईकर, फुर्तादो यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

मुख्य सचिवांकडे करणार तक्रार

शहरात पे-पार्किंगचे कंत्राट घेतलेल्या जुवारकर असोसिएट कंपनीला दिलेल्या मुदतवाढीचा प्रस्ताव आपण मांडला नसतानाही, त्यात आपले नाव कसे आले? असा सवाल मडकईकर यांनी आयुक्तांना केला. यावेळी मडकईकरांचा राग अनावर झाल्याचे दिसून आले. त्याशिवाय याबाबत आपण मुख्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी फुर्तादो यांनी आयुक्तांनी ते पत्र मागे घ्यावे, असा सल्लाही दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT