Heavy traffic restricted running through Chorla Ghat Dainik Gomantak
गोवा

घाटमार्ग अवजड वाहतुकीला बंद; राज्यातील ट्रकव्यावसायिक संकटात

परप्रांतीयांनाच काम : स्थानिकांना सरकारी मदतीची अपेक्षा

दैनिक गोमन्तक

फोंडा : अनमोड, चोर्ला आणि आंबोली घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने मालवाहतूक करणारे ट्रक मालकांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तसेच गोव्यात विविध ठिकाणी असलेल्या मालवाहतूक कार्यालयातून परराज्यातील ट्रक मालकांना अधिक प्रमाणात काम मिळते.

त्यामुळे स्थानिक अवजड मालवाहतूक करणाऱ्या मालकांना सरकारने मदत करण्याची मागणी टेम्पो व मालवाहतूक असोसिएशनने फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष केवल च्यारी, सचिव अनुराग च्यारी, श्रीकांत च्यारी, एम. के. नायडू व राहुल महातूमगडे उपस्थित होते. असोसिएशनतर्फे विविध समस्या सोडविण्यासाठी संबंधित खात्यांना खात्याकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. परंतु अजून सरकारने यावर निर्णय घेतलेला नसल्याचे दिसून येते.

गोव्यातील पोलीस सुद्धा स्थानिक मालवाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. इतर राज्यांपेक्षा गोव्यातील पोलिस स्थानिक मालवाहतूक करणाऱ्या ट्रका विरुद्ध कारवाई करीत असतात. तसेच इतर राज्यातून गोव्यात येणारे ट्रक क्षमतेहून जास्त माल घेऊन येतात. परंतु त्या ट्रकवर कारवाई होत नसल्याचे श्रीकांत च्यारी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT