Heavy rains continue in Bicholim Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: वरुणराजाचा कहर, डिचोलीत मुसळधार; VIDEO

Goa Weather: डिचोलीत मुसळधार पावसाने झोडपून काढल्यामुळे रस्ते पाण्याखाली आले आहेत.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मागील दोन दिवसांपासून राज्यात (Goa) सक्रिय झालेल्या वरूणराजाने आज कहर केला असून, डिचोलीत मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. सकाळपासूनच तालुक्यातील सर्व भागात संततधार आणि जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मुसळधार पावसाने झोडपून काढल्यामुळे रस्ते पाण्याखाली आले आहेत. रस्त्याच्या बाजूने तसेच सखल भागात पाणी साचून राहिल्याने बहूतेक ठिकाणी जलमय चित्र दिसून येत आहे. (Heavy rains continue in Bicholim)

पाण्याची पातळी वाढली

डिचोली नदीसह साखळीतून वाहणाऱ्या वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. डिचोली नदीचे बाहेर फुटू लागले आहे. दुपारपर्यंत डिचोली नदीच्या पाण्याची पातळी 3.6 मीटरहून तर साखळीतील वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी 3 मीटरपेक्षा अधिक वाढली आहे. आजच्याप्रमाणे उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

तशी शक्यता गृहीत धरून आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. नदीकाठी पम्पिंग सुरु झाले आहे. मागील दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे बळीराजा समाधानी असला, तरी आज पडलेल्या संतत आणि मुसळधार पावसामुळे शेतीच्या मशागतीची कामे करण्यात शेतकऱ्यांना काहीसी अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान मध्य अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली असून ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. पावसाबरोबर ताशी 30 ते 40 नॉटिकल मैल वाऱ्याचा वेग असेल, असाही वेधशाळेचा अंदाज आहे. 12, 13 आणि 14 जुलैला राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT